ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
अहंकाराचा लवलेश
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकजी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
4
अहंकाराचा लवलेश
अहंकाराचा लवलेश नसावा
आपल्या वागण्या बोलण्यात
चांगुलपणाचा भारवाही व्हावे
आपण आपल्या जीवनात ||१||
कर्म साधना करावी नेहमीच
सत्याचा मार्ग स्विकारून
आळसाला थारा नसावा
मानापमान द्यावा झुगारून ||२||
थोडाही लवलेश नसावा
कामचुकार त्या वृत्तीचा
यथाचा नंदादीप तेवण्या
यत्न करावा सक्तीचा ||३||
आत्मविश्वास करील कधीही
आपला अखंड जयजयकार
अहंकार जडला जर क्षणिक
बंद होईल यशाचे दार ||४||
म्हणून लवलेश अहंकाराचा
नको कदापि आपल्या ठायी
वाट चालताना सत्कर्माची
वरदान मिळेल आनंददायी ||५||
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकजी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
4



