‘मराठी राजभाषा’ दिनानिमित्त युवा काव्य संमेलन संपन्न
वसुधा वैभव नाईक, पुणे
‘मराठी राजभाषा’ दिनानिमित्त युवा काव्य संमेलन संपन्न
वसुधा वैभव नाईक, पुणे
पुणे. (दि ४): शहरातील निर्मल पार्क, धनकवडी येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त नुकतेच घरगुती वातावरणात काव्य संमेलन घेतले. काव्य संमेलनाला युवा मंडळी होती.
काव्य संमेलनला सुरुवात करण्यापूर्वी सरस्वती पूजन केले गेले. गौरव व मयुरी या नवदांपत्यांच्या हातून दीप प्रज्वलन केले. सरस्वतीची आराधना झाली,श्लोक म्हटले. नंतर काव्य संमेलनला सुरुवात केली.
मा. सुभाष कर्णिक हे ज्येष्ठ प्रसिद्ध कवी, लेखक काव्य संमेलनला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी एक चारोळी सादर केली ती खूप भावली.
आयुष्याचे गणित
सुटता सुटत नाही
आणि सुटलेच तर
आयुष्य शिल्लक राहत नाही
अशा भारदस्त चारोळीने उत्तम सुरुवात झाली. त्यांची’ चिंगी ‘ या कवितेने सर्वांची मने जिंकून घेतली. ‘काही सांगायचे आहे ‘ ही कविता मनाला भावली.
संगम या युवा कवियत्रीने सावित्रीबाई फुले, सख्या ऐक ना, मनातील विचार इत्यादी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. मनातील विचार कवितेद्वारे लेखणीतून सादर करून मन शांत केले.
ज्योती या युवा कवियत्रीने आयुष्य, क्षण एक स्वतःसाठी, मराठीची गोडी इत्यादी कविता सादर करून रसिकांना जिंकले. योगेश या युवा कवीने शब्दसखा,आई, वणवा, खाण्याचे संमेलन, प्राण्यांचा दवाखाना, इत्यादी कविता म्हणून सर्व रसिकांची मने जिंकली.
अंश या लहान मुलाने ‘प्रेमळ शिक्षक’ ही त्याची कथा वाचून सर्वांना आश्चर्य चकित केले.नव लेखक उदयास येताना दिसले. शीतल या नव कवयित्रीने राजस्थानमधे सून आणि मुलगी यामध्ये कसा भेदभाव होतो यावर काव्य सादर केले. सर्वांची मने जिंकली.
वसुधा या ज्येष्ठ कवयित्रीने तूच माझी सखी लावण्याची खाणी, दर्पण, प्रेम म्हणजे काय असतं? इत्यादी कविता सादर करून सर्वांना आनंद वाटला. सरते शेवटी मा. श्री.कर्णिक ‘सुनबाई बद्दल सासूची तक्रार ‘ ही उत्तम कविता सादर केली.व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
कार्यक्रम अगदी घरगुती साधा होता. पण सर्वजण खुश होते. आनंदी होते. मराठी राजभाषा दिन अशा प्रकारे सुंदर साजरा झाला.
माय मराठी राजभाषा माझी
अत्यंत मधुर आहे, गोड आहे
मानव इथला इमानदार आहे…



