
0
5
7
4
4
8
इंद्रधनु
पाऊस जाऊन ऊन आले
आकाशी इंद्रधनु फुलले
सात रंगांची न्यारी कमान
सारे रंग नभांगणी चमकले
लाल, नारिंगी, पिवळा रंग
हिरवा, निळा जांभळा संग
आसमंतात निळा रंग
सोबतीला दिसे सारेच रंग
डोंगरावरून झुकून पाहे
डोकावे नदीच्या पाण्यात
पोरांच्या मनाला भुरळ घाली
रंगांची उधळण करत
ए इंद्रधनू खाली ये ना रे
मला जरा हात लावू दे ना
पकडायला गेलं तर हसतोस
ढगाआड जाऊन लपतोस
रंग मिसळले कुणी असे
देवानेच रंगवले दिसे हा
आकाशाचा झोपाळा जणू
सुंदर किती दिसतो पहा
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
5
7
4
4
8



