0
4
8
2
8
7
बाल शिवबा
जन्मला शूर सिंह
जिजाऊच्या पोटी
शिवजयंती आज
प्रणाम कोटी कोटी….
पदस्पर्शाने त्यांच्या
उजळला शिवनेरी
हिंदवी स्वराज्याचे
स्वप्न जिजाऊ ऊरी…
बाल शिवबा खेळ
युद्धनीतीचे खेळले
जिजाऊ दादोजींनी
शौर्यगुण ओळखले…
जिजाऊ आशीर्वाद
हाती दिली तलवार
शिवबाने युद्धनीतीने
जिंकले गड अपार…
गड किल्ले साक्ष देती
अद्वितीय शिवबा शूर
मानाचा मुजरा विश्वात
अभिमानाने भरतो ऊर…
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
=========
0
4
8
2
8
7



