
0
4
0
9
0
3
अनुबंध
अनुबंध हा प्रेमाचा
ओलावा रे वाढवितो
निर्मळ मनाने जपू
आयुष्य हे घडवितो
अनुबंध हा प्रेमाचा
वाढे आनंदी झाड
हास्यांची मेजवानी
पुरवितो सर्व लाड
अनुबंध हा प्रेमाचा
जिव्हाळ्याची शेती
ओढ भेटीची लागे
संकटात हात देती
अनुबंध हा प्रेमाचा
प्रितझुला हालवितो
मरगळ ती कष्टाची
क्षणार्धात घालवितो
अनुबंध हा प्रेमाचा
गोडवा तो जगण्यात
जपू जरा शब्दास्त्र
मजा नाही डागण्यात
मजा नाही डागण्यात
संग्राम कुमठेकर लातूर
=========
0
4
0
9
0
3





