शिक्षक बदली पोर्टल हॅंग का झाले ?
जाणून घेऊ या...!!! का दिली मुदतवाढ?
शिक्षक बदली पोर्टल हॅंग का झाले ?
जाणून घेऊ या…!!! का दिली मुदतवाढ?
दि ५ पासून आपण संवर्ग ४ चे फॉर्म भरण्यास सुरुवात केली. आपण वेळोवेळी संवर्ग 4 च्या सीनियर लोकांना आवाहन केले होते की सर्वांनी अगोदर आपले फॉर्म सबमिट करावे, जेणेकरून ज्यूनिअर्सना फायदा होईल आणि सर्वर वर लोड येणार नाही परंतु असे लक्षात आले की पहिल्या दिवशी फार कमी फॉर्म सबमिट होते. दुसऱ्या दिवशी ती संख्या कमीच होती. त्यामुळे दि. 06 रोजी म्हणजे शेवटच्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातील शिक्षक बंधूंनी बदली फॉर्म भरण्यास खूप धूम केली. मग एवढा गोंधळ निर्माण झाला की त्यामुळे सर्वरवर प्रचंड प्रमाणात लोड आला.
वास्तविक *VINSYS* ने सर्वर जेव्हा तयार केले होते त्यावेळेस दहा लाख लोक एकाच वेळेस लॉगिन करतील एवढी क्षमता होती. एवढे शिक्षक पण राज्यात नाहीत. परंतु आपल्या शिक्षकांनी मात्र असा काही प्रताप केला की त्यामुळे एकाच वेळेस सर्वरवर पंधरा लाखापेक्षा लोक लॉगिन होते. व otp मागत होते.याचे कारण असे की
१. जे कोणी फॉर्म भरत होते त्यांच्या शेजारी त्यांच्या घरातील माम भाऊ, फुय भाऊ, मावस भाऊ व इतर लोक, मित्रमंडळी लॉग इन करून इतर लोकांचे लोकांनी कोणते गाव टाकले याबद्दल चौकशी करत होते.
२. शिवाय ज्यांचा बदलीशी संबंध नाही किंवा ज्यांची बदली होऊन चुकली तेही लोक उत्सुकतेपोटी लॉगीन करत होते, पाहत होते.
त्यामुळे अपेक्षित लॉगइन पेक्षा या लॉगिनची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने हा गोंधळ उडालाच
दि. 07 ला vinsys कडून सकाळपासून 12 tasast 14 Laks OTP and SMS गेले होते.
दि.08 ला vinsys कडून 17.87 लाख otp आणि sms गेले aahet
शेवटी विनसिसला पण वरिष्ठ यांची परवानगी शिवाय दि. 07 ला वेळेवर काहीही करता आले नाही. व लॉगीन संख्या लवकर वाढवता आली नाही. नंतर VINSYS ला दि. 08 ला OTP संख्या दहा लाखाहून 18 लाख करावी लागली तेव्हा पोर्टल फास्ट वेगवान चालू लागले. त्यामुळे एकट्या विनसिसवर दोष देऊन चालणार नाही.
आपल्या घरी कार्यक्रम असला आणि आपण जर 500 लोक बोलाविले त्याप्रमाणे आपले जेवणाचे नियोजन असते. परंतु त्या 500 लोकांनी आपल्या सोबत इष्ट मित्र मंडळी आणली आणि ती संख्या 1500 झाली तर त्यांची फजिती होणारच व वेळेवर धावपळ करावी लागणार तसे पोर्टलचे झाले
_एका व्यक्ती ऐवजी जास्त लोक लॉग इन करून जर पोर्टलवर माहिती घेत असतील किंवा इतरांची बघत असतील . तर तितक्या नंबर वर तितके ओटीपी जातील आणि एकच व्यक्ती जास्त ठिकाणावरून लॉगिन होईल ._
_पर्यायाने क्षमतेपेक्षा जास्त लोक पोर्टलवर काम करत असल्यामुळे त्यावर ताण पडेल . सहदयतेने विचार केल्यास इतरांना संधी मिळणे गरजेचे आहे ._
_कोणतीही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा ही योग्य पद्धतीने काम करते परंतु त्याचा वापर तेवढ्याच योग्यतेने करणे गरजेचे आहे . किमान जे सीनियर आहेत त्यांनी लवकर माहिती भरणे अपेक्षित होते . जूनियर लोकांनी थोडे उशिरा माहिती भरणे गरजेचे होते त्यांनी वाट सुद्धा पाहिली पण उशीर झालाच होता ._
दोन दिवस वाढलेले आहेत सर्वांना शुभेच्छा लवकर माहिती भरा
जे शिक्षक नेहमी नेहमी वारंवार विनाकारण लॉगिन करत आहे,अशा शिक्षकांचा डेटा रेकॉर्ड होत आहे व vinsys ने rdd ला पाठवला पण. सब की जन्म कुंडली तैयार आहे.
उपलब्ध माहितीनुसार शिक्षण सेवक देखील विनाकारण लॉगिन करत असल्याचे विन्सेस च्या रेकॉर्डमध्ये आले आहे, शिक्षण सेवकांसह बदली प्रक्रियेत नसलेल्यांचे आयपी ऍड्रेस व मोबाईल क्रमांकाची माहिती देखील ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आली आहे. संबंधितांवर कार्यवाही होणे बाबत शक्यता वर्तवली जात आहे, कृपया आपण या बदली प्रक्रियेत नसाल तर वारंवार लॉगिन करू नये.





