Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

बळवंत वालेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सन्मान

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

बळवंत वालेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सन्मान

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग (दि. ८) ज्येष्ठ सदस्य व सल्लागार बळवंत वालेकर सर यांची रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या समन्वय समितीच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबाबत ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोलीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर यांच्याहस्ते सन्मान केला .

या संस्थेची सभा संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात आयोजिली होती . या सन्मानाबाबत सत्कारमूर्ती ने आपल्या भाषणात क्रुतज्ञता व्यक्त केली. सदर सभेत अन्य विषयाबरोबर दि. २१ सप्टेःबर २५ रोजी साजरा करावयाच्या वर्धापनदिनावर विशेष चर्चा झाली. सदस्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कला- गुणांना संधी देण्याचे ठरले. या सभेत अनेक सदस्यांनी संस्थेच्या प्रगतीबा बत अनेक सूचना केल्या. शेवटी उपाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , उपाध्यक्ष नंदकुमार पाटील , सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर , खजिनदार जनार्दन पाटील , सहखजिनदार माधुकर पाटील , तसेच एकनाथ रा घो म्हात्रे , प्रकाश जोमा पाटील , प्रदीप पाटील , नरेंद्र ( बाळू ) पाटील , चंद्रकांत जगताप श्रीमती प्रतिभा खा़डेकर , दत्तात्रेय चांगू वाघपंजे , सौ, पुष्पा दामोदर ठाकूर , मधुकर भगवान वालेकर बाळाराम महादेव पाटील , शरद शिंगरुत इ. उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे