Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध

बहर

रंजना राहुल ब्राह्मणकर अर्जुनी/मोर, जि गोंदिया

0 4 8 2 5 1

बहर

जुने ते पाने गळून पडले
नवी अंकूरली ती पालवी
नव्या ॠतूचे आगमण झाले
आला वसंत बहर नवा||धृ||

नवा उत्सव नव निर्मीती
विविध रंगानी बहरली धरती
कामदेवाचे झाले आगमण
प्रेम युगलांचे झाले मिलन||१||

नभात वाहे वारा धुंद
कोवळी पालवी सुखवी मंद
नव्या बहराचा पसरे सुगंध
सरस्वतीचा वाजे मृदंग||२||

सणा सुदीचे वाजले नगारे
लावली दारी सुंदर तोरणे
नटल्या बाया लेवून पैठणी
वाण सुगड्याचे घेऊ वाटूनी||३||

सण सौभाग्याचा कुंकू धन्याचा
शोभे मळवटी तेज लाल
विरता झळके त्याच्या कार्यात
मिरवे कपाळी त्याची भार्या||४||

कृष्णाला आवडे ॠतूराज
बासरीचे सुर मधूर आवाज
गवळणी जस्या धुंद मधुरात
भंवरे जसे बंदिस्त कमळात||५||

रंजना राहुल ब्राह्मणकर
अर्जुनी/मोर, जि गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे