0
4
8
2
9
0
श्रावणमास
श्रावणधारा बरसती
तृप्त होई धरती
सृष्टीस नवरंग चढे
चैतन्य पसरे चोहीकडे
उन सावल्यांचा लपंडाव
सृष्टी परीधान करी नवा पेहराव
हिरवी कंच होई धरती
बीजातुन अंकुर जन्मती
कोकीळेचा कर्णमधुर स्वर
ऐंकू येई दूर-दूर
मयूर वनी थिरकती
जलधारा बरसती
वृक्ष फळा- फुलांनी भरपूर
नदी वाहते ओसांडून
आकाशी पाखरांचे थवे
गाती गीत नवे-नवे
इंद्रधनु नभाची वाढवी शोभा
मुखमंडली नव तेज,नव आभा
कृषक करती कृषी कर्म
दिशा दिसती आनंदीत सर्व
मंदिरी आरतीचे स्वर
करती मनास निर्मळ
दरवळे वायुसंगे
फुलांचा सुगंधीत परीमळ
नव निर्मितीची सर्वांस आस
जीवास मिळवून देण्या घास
वांछीत प्राप्त करुन देण्या
येतो वर्षांतून श्रावणमास
पंकज रामकृष्ण चारथळ
बजरंग नगर कोराडी रोड नागपूर
========
0
4
8
2
9
0



