वि. स. खांडेकरांच्या जयंतीदिनी ग्रंथपूजन
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
वि. स. खांडेकरांच्या जयंतीदिनी ग्रंथपूजन
खांडेकर स्मारकात कार्यक्रम उत्साहात साजरा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे दि.14 (प्रतिनिधी) कथाभारती आणि ग्रंथालय भारती यांनी संयुक्तपणे मराठीचे ख्यातनाम लेखक कादंबरीयुग निर्माते आणि पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मभूषण स्व. वि. स खांडेकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य श्याम भुर्के आणि माधुरी सहस्रबुद्धे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खांडेकरी साहित्याचा सन्मान म्हणून वि सं.च्या लोकप्रिय ग्रंथाचे पूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य श्याम भुर्के यांनी खांडेकरांचा ध्येयवादी विचार, आदर्शवादी जीवनतत्त्वं आणि “जीवनासाठी कला” या उद्देशाने लिहीलेल्या कादंब-या या अनुषंगाने एकूण त्यांच्या लेखन प्रवासाविषयी अभ्यासू निरीक्षणे मांडली. यावेळी बोलताना भुर्के म्हणाले,”जगण्यासाठी कला ही त्यांची जीवन धारणा होती. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले खांडेकर नंतर अधू दृष्टी आणि आर्थिक चणचण यांनी ग्रस्त असूनही त्यांची प्रतिभा मात्र कधी कोमेजली नाही.”
माधुरी सहस्रबुद्धे यांनी खांडेकरांच्या रूपक कथा या जीवनाचे सार सांगणा-या व नीतिबोध देणा-या होत्या, अशा शब्दात गौरव करून खांडेकरांचे मराठी साहित्यातील योगदान बहुमोल आहे, असे प्रतिप्दन केले. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कथाभारती आणि ग्रंथालय भारती या संस्थांच्या
कार्याचा थोडक्यात परिचय दिला. शेवटी उपस्थितांचे आभार मानले. लॉ कॉलेज रोड येथे खांडेकरांचे छानसे स्मारक उभारण्यात आले आहे, इथे सर्व साहित्यप्रेमींनी भेट द्यावी, असेही आवाहन यावेळी पुणेकर रसिकांना करण्यात आले.



