ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
संस्कारांचे धडे
सविता धमगाये ता. जि.नागपूर

0
6
2
9
9
2
संस्कारांचे धडे
लाज सोडली सत्तेने
लोकशाही द्रोपदी केली
चिंध्या करून संविधानाच्या
म्हणे नितीमत्ता जगी मेली
ते सांगतील आम्हाला
रोज संस्कारांचे धडे
करून न्यायव्यवस्था नागडी
रोज काढती धिंडवडे
नारी आम्हा पुजनीय
सांगती आहे देवीसमान
रस्त्यावर अबला ओढूनी
अब्रूस लुटती नीच हैवान
हैवानाला सन्मान देत
देऊनी मोक्याच्या जागा
सज्जन कारागृहात मरती
सत्तेला ना काही लाजलज्जा
लढती पोरे न्यायासाठी
शेतकरी शोषितांचा लढा
मागणी अगदी साधीसुधी
न्यायव्यवस्था मार्गी काढा
ना सोयरसुतक जनतेशी
अमाप भरती घरे आपली
चोर चोर सख्खे भाऊ
रंगा बिल्ला जोडी जमली
वाट लावा रे हैवानांची
पळता भुई थोडी करा
अन्यायाविरूद्ध लढण्या
आपसातील भेद दूर सारा
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
=========
0
6
2
9
9
2



