ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजीनगरसाहित्यगंध
फितूर इथेच आहेत
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0
5
2
2
6
7
फितूर इथेच आहेत
आतूर जरी असे मी
शत्रूस देण्यास मात
फितूर इथेच आहेत,
करण्यास माझा घात..//
का होतोय येथे माझा,
नाकाम प्रत्येक प्रयास
मग कळले यथावकाश,
चुकला माझाच कयास..//
पाठीराखेच ठरताहेत
पाठीवर वार करणारे
अन्यथा कैक झेललेत
इथे छातीवर भिडणारे..//
पारखून घ्यावे लागतील
इथे आपल्यातले परके
फाडावे लागतील बेगडी
आता इमानदारीचे बुरखे..//
इतिहास आहे साक्षीला
फितूरच घातकी ठरलेत
महाप्रतापी वीर धुरंदरही
ज्यांनी हकनाक वधलेत…
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
2
2
6
7



