Breaking
अमरावतीई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

वरदहस्त

श्रीमती सुलोचना लडवे जिल्हा अमरावती

0 6 5 0 7 0

वरदहस्त

दूर करी सर्व विवंचना
राहो सर्व समाधानी
करी विकारांना नष्ट
सत्वतेज राहो मनी

कलह सारे दूर करी
वाढो एकीची भावना
प्रेमभावाची परस्पर
व्हावी सदैव स्थापना

गरीबीचे चटके जरी
नको कुणापुढे लाचारी
गरजा भागू दे सर्वांच्या
नांदो सुख शांती घरी

शेतकरी,कामकरी
संकटाने असे त्रस्त
मदतीची हाक देऊन
मिळवावा स्नेह हस्त

वरदहस्त गणराया
राहो सदा सर्वावरी
मनोभावे तुझी अर्चना
करी कृपा भक्तांवरी

श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 0 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे