आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरमुंबईसाहित्यगंध
तुझं असणं
संध्या मनोज पाटील अंकलेश्वर (गुजरात)

0
5
2
4
6
1
तुझं असणं
तुझं असणं…
तुझं हसणं…
डोळ्याला तू दिसणं..
एवढंच तर होत मागणं…
तुझं नितांत प्रेम करणं..
डोक्यावरून मायेचा हात फिरवणं..
आम्ही त्या प्रेमात सुखावणं..
एवढंच तर होत मागणं….
चांगल्या वाईटाची जाण देणं..
चुकांना पोटात घालणं…
कधी वरवर कठोर होणं…
एवढंच तर होत मागणं….
तुझं घरात असणं..
भिंतींचही श्वास घेणं…
बागेचही खुलून फुलणं…
एवढंच तर होत मागणं….
आई…आता तू नाहीस..
वाटत,संपलं सारं जगणं..
ना कोणास आई म्हणणं..
ना उरल आता काही मागणं…
ना उरल आता काही मागणं…!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)
============
0
5
2
4
6
1



