Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

ज्येष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत धुमाळ यांचा सन्मान; “अर्ध्या शतकाहून अधिक काळाची छायाचित्रणातील सेवा गौरवली”

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 4 1 4

ज्येष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत धुमाळ यांचा सन्मान; “अर्ध्या शतकाहून अधिक काळाची छायाचित्रणातील सेवा गौरवली”

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग (दि २१) : जागतिक छायाचित्रदिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत धुमाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अलिबागमध्ये झालेल्या या कार्यक्रमात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री. धुमाळ यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून ते रायगड जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे छायाचित्रण करत आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पहिली कलर फोटो प्रिंटिंग लॅब सुरु करून जिल्ह्यातील अनेक छायाचित्रकारांना तात्काळ सेवा पुरवली होती.

यावेळी बोलताना अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे म्हणाले, “चंद्रकांत भाऊ हे केवळ छायाचित्रकार नाहीत, तर ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी नव्या पिढीला संयम, निरीक्षण आणि कथा सांगणारी फ्रेम कशी असावी हे शिकवले.”

सचिव विकास पाटील यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगातही त्यांचा निसर्ग, माणसे आणि क्षण टिपण्याचा दृष्टीकोन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

सन्मानाला उत्तर देताना चंद्रकांत धुमाळ म्हणाले, “कॅमेरा हा फक्त साधन आहे. खरी गोष्ट म्हणजे माणसाशी असलेले नाते आणि क्षणाला आदर देणे. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा देणारा आहे.”

या कार्यक्रमाला रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदै, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग असोसिएशन चे खजिनदार विवेक पाटील, अमर मढवी, जयेंद्र वाघमारे, निलेश दुदम, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे