नेमकं जगावं कसं ? तर शाळेतल्या शिक्षकासारखं…!ज्ञानेश्वर माशाळकर
नेमकं जगावं कसं ? तर शाळेतल्या शिक्षकासारखं…!
शिक्षकाचे कार्य पवित्र कार्य आहे.शिक्षक हा चोवीस तास कार्य करतो.शिक्षक कोणतेही कार्य करयाला तयारच असतात. तासन् तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही शिक्षकच घडवतो याची माज नाही….! अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो; परंतु त्यातल एकही मूल आपलं नाही… आपण फक्त शिकण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…!
निकालासाठी एखाद्या वेळी दुसऱ्यांशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं मानून दुसऱ्यांशी बोलत राहायचं….,! “पुढे चला… खूप शिका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस म्हणजे शिक्षक. खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच…
पण कुणावर विशेष लोभ नाही…
कोणावर राग तर मुळीच नाही…
कुणाचा द्वेष नाही…
कुणाचा तिरस्कार नाही…
शाळेतील लेकरासाठी आई आणि बाबा तोच होतो. आपला संबंध फक्त शिकवण्यापुरता… !
कुणी मध्येच शाळा सोडून गेला तर त्याचे दुःख सोसायच. कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायच. दोघांसाठी नेहमीच वर्गाच दार उघडायचं. येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे. दहावी-बारावीला पोहोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे. प्रत्येक वर्गात थोडावेळ थांबायच . आपलंच वर्ग आहे, असं समजून थोडावेळ रेंगाळायचं. पण त्या वर्गात भावनिक गुंतायच नाही. आपण इथे थांबता कामा नये, हे स्वतःशी बजावत, पुन्हा दुसऱ्या वर्गात पुढच्या “तासिकेला” जायचं…!
“सिंगल” बेल मारली ,की शिकवण थांबावायचं. “डबल”बेल मारली की दुसर्या वर्गात निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही… दहावी – बारावीचा टप्पा म्हणजे शेवटचा स्टॉप आहे. सगळ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करून घ्यावे…. असं सर्वांना बजावत स्वतःच निरोप द्यायचा आणि परीक्षा संपल्या की “मुक्या मनानेच” इतर विद्यार्थ्यां सोबत अध्यापनात रमण्यासाठी निघून जायचं…. !
उद्या कोणत्या वर्गात जायचं ? कधी निघायचं ? वर्ग कोणता असेल…. ? हे ठरवणारा वेगळाच असतो. उद्या कोणत्या तासिकेचे निरीक्षण असेल याची माहिती नाही… निरीक्षक कोण असेल याचीही खात्री नाही. सोबत विद्यार्थी कोण असतील याची शाश्वती नाही. शाश्वत एकच आहे… ते म्हणजे अध्यापन…! आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… अध्यापन कोणाच ना कोणाच तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि चिरंतन…! आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… अधयापन मात्र सुरूच राहणार आहे…. निरंतर आणि निरंतर…!असे एकच पद आहे ते म्हणजे कार्यरत असताना ही गुरुजी आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर गुरुजीच तसेच मृत्यू नंतर ही गुरुजीच.म्हणून गुरुजीचे कार्य सर्वांपेक्षा वेगळे आहे.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव



