Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 3 7 9 9

जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग/रायगड: (दि १६) जे. एस. एम. व अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील हे उपस्थित होते. तर उपाध्यक्षा मा. डॉ. साक्षी पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य मा. डॉ. सोनाली पाटील, अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मा. डॉ. नीलम हजारे आदि मान्यवर उपस्थित होते.

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने या कार्यक्रमास प्रारंभ झाला.
अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य अ‍ॅड. डॉ. नीलम हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा व अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वत:च्या व समाजाच्या उत्कर्षासाठी विनियोग करावा असे आवाहन करत त्यांनी भावी आयुष्यात विशेष कर्तृत्व करून दाखवावे असे प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अ‍ॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली.
यावेळी जे. एस. एम. महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधून
पदवी प्राप्त केलेल्या २०७ विद्यार्थ्याना तर विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ८० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य अ‍ॅड. नीलम हजारे व विविध विषयांचे विभागप्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली .

यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समितीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रेम आचार्य व प्राध्यापक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे