जि.प.पू .माध्य .शाळा चुटिया (मुले) तृतीय पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
जि.प.पू .माध्य .शाळा चुटिया (मुले) तृतीय पुरस्काराने सन्मानित
व्यसनमुक्त पहाट कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण
जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
गोंदिया : श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा आयोजीत व्यसनमुक्त पहाट कार्यक्रम दिनांक ३१ /१२/२०२४ ला श्री गुर्जर क्षत्रीय समाजवाडी , गोंदिया इथे मोठ्या थाटामाटात व भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रमात जि. प.पू .माध्य .शाळा चुटिया (मुले) केंद्र -नगपुरा प .स.गोंदिया यांनी सादर केलेली व्यसनमुक्त दंडार या कार्यक्रमाला उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दंडारकार किशोरकुमार बन्सोड (स.शि.) व चमू यांना चित्रपट अभिनेत्री चंद्रलेखा जोशी , विजया बाबर , डॉ सृष्टी बहेकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . पुरस्काराचे स्वरूप ५००० रुपये ,सन्मानचीन्ह ,व सन्मानपत्र असे होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा .प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया , मा. परीस देशमुख, पोलीस उपमहानिरीक्षक राजस्थान ,चंद्रभान खंडाईत उपविभागीय अधिकारी गोंदिया, डॉ .दिशा पडई सहा .धर्मदाय आयुक्त , श्रीमती मीनाक्षी बन्सोड सहा.राज्य कर आयुक्त मा .अनिल देशमुख समाजकल्याण अधिकारी, चित्रपट अभिनेत्री चंद्रलेखा जोशी ,विजया बाबर ,डॉ .सुष्टी बहेकार व ममता नंदागवली विमानतळ पोलीस निरीक्षक मुबंई , मा.विजय बहेकार संस्थापक श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था हे होते.
तसेच कार्यक्रमात प्रा .सविता बेदरकर ,धन्नालाल नागरीकर, डॉ .प्रकाश धोटे ,मुरलीधर माहोरे , भावना कदम ,गजानन फुंडे, एड.ओमप्रकाश मेठी,कैलाश भेलावे , मुन्नालाल यादव , शामराव बहेकार ,सुशीला बहेकार, रुपाली खांदेकर ,रामकृष्ण चौधरी सह शेकडो नागरीक उपस्थित होते. शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल जि.प.पू .माध्य .शाळा चुटिया ( मुले ) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .