टीम स्पोर्टिफाय तर्फे धावण्याच्या शर्यतीचे आयोजन
धावपटूंनी धानोरी ते मुंबई अंतर १८ तासात केले पूर्ण
टीम स्पोर्टिफाय तर्फे धावण्याच्या शर्यतीचे आयोजन
धावपटूंनी धानोरी ते मुंबई अंतर १८ तासात केले पूर्ण
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: दि.२४डिसें.(प्रतिनिधी) पुण्याच्या “चेतना फाऊंडेशन” या एन.जी.ओ.च्या विशेष मुलांच्या मदतीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने “टीम स्पोर्टिफाय” या धानोरीतील रनिंग ग्रुपच्या वतीने धानोरी ते मुंबई या मार्गावर धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीचा मार्ग पुण्यातून धानोरी, विश्रांतवाडी, खडकी, चिंचवड, लोणावळा तसेच खोपोली, पनवेल, वाशी मार्गे चेंबूर ते थेट मुंबईत गेट वे ऑफ इंडिया पर्यंत आखण्यात आला होता. हे एकूण १७३ कि.मी.चे अंतर शर्यतीत सहभागी धावपटूंपैकी 19 जणांनी १८ तासांत पूर्ण केले.
आकाश होळकर,अरुण अकेला,आशिष पठाडे, हितेश सिरोया, किरण मोरे, कुणाल उपाध्ये,लक्ष्मी कण्डन, मंगेश थोरात, मनोज कल्याण, नीरज नागर, निखिल राऊत, प्रज्ञा इंगळे या धावपटूंनी आपली उत्तम कामगिरी नोंदवली. याशिवाय; रोहित परदेशी, सत्या उपाध्याय, शैलेश कोल्हे, श्वेता खेराज, श्रीकांत नुला, वैभव नेहे, विजय बनसोड हे धावपटूंही शर्यतीत सहभागी झाले होते.
यापूर्वी “टीम स्पोर्टिफाय” यांनी धानोरी ते पाचगणी, तसेच धानोरी ते जेजुरी आणि धानोरी ते सिंहगड किल्ला अशा शर्यतींचे आयोजन केलेले आहे. धावण्यातून प्रकृती तंदुरुस्त राखण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने “टीम स्पोर्टिफी” ची स्थापना सन २०१७ ला धानोरीमध्ये सन २०१७ ला करण्यात आली होती.
गेल्या सात वर्षांत या ग्रुपने धानोरी, लोहगाव,विश्रांतवाडी, टिंगरे नगर येथील शेकडो लोकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. दर वर्षी विविध क्रीडा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून शारीरिक फिटनेस या विषयात आकर्षक पध्दतीने मनोरंजक करण्यावर भर दिला जातो. परंतु धावणे म्हणजे फक्त फिटनेस नाही, समाजातील विविध समुदायांना एकत्र आणण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, म्हणूनट ” टीम स्पोर्टिफाय” च्या वतीने समाजातील दुर्बल घटक व गरजूंना मदत करण्यात येते. त्यामुळे विविध समुदाय एका धाग्याने बांधले जाऊन एकत्र येतात. त्यासाठी सर्वच लोकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. क्रीडा प्रशिक्षक श्री. विजय बनसोड यांनी हा कार्यक्रम यशस्वी करणाऱे धावपटू, समर्थक , स्वयंसेवक आणि क्रीडा रसिक यांचे आभार मानले.