दोन्ही किडन्या निकामी झालेल्या ‘शारदा चक्के’ या मुलीच्या मदतीला देवदूत म्हणून धावले आमदार ‘संतोष बांगर’
माणुसकीच्या प्रेमाबद्दल हे माझं कर्तव्य
दोन्ही किडन्या निकामी झालेल्या ‘शारदा चक्के’ या मुलीच्या मदतीला देवदूत म्हणून धावले आमदार ‘संतोष बांगर’
आत्तापर्यंत अनेक रुग्णांना मदत केली आणि करत राहणार; आमदार संतोष बांगर
माणुसकीच्या प्रेमाबद्दल हे माझं कर्तव्य
जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली
बिनधास्त न्यूज नेटवर्क
हिंगोली: हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री शिंदेचे शिलेदार म्हणून ओळख असलेले कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच गोरगरीब रुग्ण तसेच शेतकरी सर्वसामान्यासाठी नेहमी अग्रेसर राहतात. आज एका हट्टा येथील 18 वर्षीय शारदा चक्के या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या या मुलीला तिच्या आजीने किडनी देण्याचे ठरले. परंतु शारदा चक्के या मुलीच्या घरची परिस्थिती हालाखीची किडनी ट्रान्सफर करण्यासाठी एवढा मोठा खर्च कुठून येणार.
यामुळे या आठरा वर्षीय शारदा चक्के या मुलीने थेट कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना फोनद्वारे सांगितले की दादा मला वाचवा हो माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि मला माझी आजी किडनी देत आहे. परंतु किडनी ट्रान्सफर करण्याचा खर्च मी एका गरीब कुटुंबातील असल्याने ते मी करू शकत नाही दादा तुम्ही मला मदत करा मी मरेपर्यंत तुमच्या घरी भांडे धुवीन अशी हाक किडनी निकामी झालेल्या शारदाने आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली असता आमदार संतोष बांगर यांनी ‘ताई तू रडू नको’, ‘मी संपूर्ण खर्च करीन’, असे सांगितले आणि त्या मुलीची भेट घेत मदत केली व काही अडचण आल्यास मला फोन द्वारे सांग असे त्या मुलीला सांगताच त्या मुलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.





