मालदा येथील पाणी पुरवठा नियमित न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भीमराव मेश्राम, प्रतिनिधी
मालदा येथील पाणी पुरवठा नियमित न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मालदाचे ग्रामस्थ ‘हंडाफोड’ आंदोलनाच्या तयारीत
लाखांदूर तालुक्यात जल जीवन मिशन योजनेचे तीन तेरा
भीमराव मेश्राम, प्रतिनिधी
भंडारा: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत ‘जल जीवन मिशन योजना’ सुरू करण्यात आली होती. लाखांदूर तालुक्यातील मुर्झा/मालदा या गावातही योजना सुरू झाल्यापासून अंदाजे महिनाभर ग्रामस्थाना नियमित पाणी पुरवठा होत होता. परंतु मागील काही दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने गटविकास अधिकारी लाखांदुर यांना ग्रामस्थांनी पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी नुकतेच निवेदन दिले असून येत्या दोन दिवसात गावात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास ‘हंडा फोड’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती लाखांदुर ग्रा.पं. मुर्झा/मालदा येथील चालू स्थितीत जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर अंदाजे 1 महिना मालदा वाशीयांना चांगल्या प्रकारे पाणी मिळाले. परंतु शासनाने संबंधित ठेकेदाराचे बिल न दिल्यामुळे त्यांनी ती मोटर पॉवरवाली काढून नेली आणि निकृष्ट दर्जाची मोटार लावली त्यामुळे मालदा वाशियांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या 1 ते 2 दिवसांत पाण्याची व्यवस्था केली नाही, तर मालदावासीयातर्फे आपल्या कार्यालयावर हंडाफोड आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी लाखांदुर यांना दिले आहे.
याप्रसंगी निवेदन देतांना मंगेश ठाकरे, शुभम नेवारे, तेजस बोकडे, रोहीत राऊत, विजय राऊत, दुधराम शहारे, कल्पेश शहारे, सौ.तुरसाबाई नेवारे, श्रीहरी राऊत, नवनाथ बोकडे व निलेश शहारे आदी उपस्थित होते.





