
0
4
8
2
5
1
दिल्या घरी सुखी रहा
तू लेक लाडली माझी, मंगलम शुभ स्वहा।
आशिर्वाद माझा तुला,सुखाने संसारी वहा।।
मातापिता आम्ही तुझे,सासू सासरे विधाते।
संस्काराने होशील तु किर्तीरुपी दिशा दहा।।
अश्रु कधी ढाळू नको,नांद आनंदाने घरी।
हुंदके आवर मनी ,सदा दिव्य स्वप्ने पहा।।
माहेराला विसरुनी,मोहरुन घे सासरी ।
ऋतु कोणताही असो, हर्ष सुगंधाने नहा।।
खेळलो रमलो होतो,तुझ्यासवे हसलोही।
तव आठवात शक्ती ,मज लाभे दुःख सहा।।
निरोप देताना तुला ,ह्रदय भरून आले।
वाहताहे अश्रु माझे,बाळा सोडता हात हा।।
तुच श्वास या जीवनी,तुच माझी ग स्पंदने
विधात्यास प्रार्थना ही,दिल्या घरी सुखी रहा।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि यवतमाळ
0
4
8
2
5
1



