0
4
8
2
9
7
मैत्रिण
प्रत्येक पुरूषालाही..
अशी एखादी मैत्रिण असावी..
सावलीसारखी कायम..
तिची सोबत भासावी…
आयुष्यातली सारी सुखदुःखे…
तिच्याशी शेअर करता यावी…
दुःखल्या खुपल्या मनावर..
तिने हळूवार फुंकर घालावी…
जे बायकोशीही बोलता येत नाही..
ते सारेच तिच्याशी..
दिलखुलास बोलता यावे…
कधी अवघड वळण आलेच…
तर तिच्या सोबत चालता यावे..
आपल्या देहबोलीवरूनच…
तीने मनातले ओळखावे..
“आरे होईल सारे ठीक”
म्हणून मानसिक धैर्याचे बळ द्यावे..
झालीच कधी घुसमट…
तर तिच्यासमोर रडता यावे….
मनावरचं ओझे…
सहज हलके करता यावे…
तिने हक्काने रागवावे…
मिष्किलपणे चिडवावे…
मरगळलेल्या मनाला..
चैतन्याचे दान द्यावे…
विरंगुळ्याच्या सौख्य क्षणांनी..
तिने ओंजळ भरावी..
तिच्या आश्वासक स्पर्शाने…
आसवांचीही फुले व्हावी…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
4
8
2
9
7



