Breaking
अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमराठवाडासाहित्यगंध

ती आहे म्हणून

डाॅ.नझीर शेख राहाता, अहिल्यानगर

0 5 1 6 5 2

ती आहे म्हणून

प्रपंचास माझ्या अर्थ आहे
ती आहे म्हणून ॥
जीवन माझे सार्थ आहे
ती आहे म्हणून ॥॥१॥॥

ती आहे म्हणून मी निवांत आहे
विवंचनांपासून मी शांत आहे ॥
मला न कसली भ्रांत आहे
ती आहे म्हणून ॥॥२॥॥

जेव्हा जेव्हा मी उदास होतो
ती मजला उभारी देते ॥
प्रत्येक दुःखाची झळ कमी भासे
ती आहे म्हणून ॥॥३॥॥

मी खचलो तर ती धीर देते
प्रेमळपणे मजला साथ देते॥॥
अडचणींवर मात होते
ती आहे म्हणून ॥॥४॥॥

लेकरांवर उचित संस्कार
पाहुण्यांचा आदरसत्कार ॥
मुलांच्या शिक्षणाचा मजला न भार
ती आहे म्हणून ॥॥५॥॥

हे दुश्कर जीवन सुसह्य झाले
तीच्या स्मितहास्यावर माझे क्लेश निमाले
माझे जीवन कृतकृत्य झाले
ती आहे म्हणून ॥॥६॥॥

डाॅ.नझीर शेख
राहाता, अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे