Breaking
कविताखानदेशनागपूरसाहित्यगंध

शाळेला चला; गणेश पाटील

नंदूरबार

0 4 8 3 0 0
  • शाळेला चला

    चला मुलांनो,शाळेला चला
    सुट्या संपल्या शाळेला चला।।धृ।।

    सुरू झाली आपली शाळा
    बघू आपला ज्ञानाचा मळा।।१।।

    प्रवेशोत्सव धुमधडाक्यात
    वाजत गाजत आपले स्वागत।।२।।

    नवी नवी मोफत पुस्तकं वाचू
    नव्या नव्या कोर्या वह्यात लिहू।।३।।

    नवे पाटीदप्तर ,नवी पेनपेन्सिल
    नवी खरेदी अनं करू नवी धमाल।।४।।

    नव्या वर्गशिक्षकांशी गप्पा गाणी करू
    नव्या आपुल्या वर्गात बसू।।५।।

    नवे मित्र जोडू ,नवे खेळ आपण खेळू।
    नवे कार्यक्रम करू, नवे उपक्रम शिकू।।६।।

    नवा गणवेश नवा अभ्यास
    चला शाळेचा लागला ध्यास।।७।।

    एकदा शाळेचा लागता लळा
    नियमित शाळेत येई बाळा।।८।।

    गणेश नरोत्तम पाटील
    ता.शहादा जि.नंदुरबार

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे