ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
निरोप सरत्या वर्षाला
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
0
निरोप सरत्या वर्षाला
गतवर्षी पावसाच्या खेळात
घडलेल्या घटना विसरून
निरोप सरत्या वर्षाला देऊ
चांगल करण्याचा संकल्प करून
नववर्षाचे स्वागत करू
नवीन वर्ष नवीन आशा
नवीन नियोजन कर्तुत्वाच
संकल्प पूर्तीसाठी असेल भाषा
नैराश्यमय दुःखदायी घटनांना
तिलांजली देऊन सत्कर्म करूया
एकमेका साह्य करू नाते टिकवू
एक नवा भावबंध जुळवूया
देऊआलिंगन उद्याच्या नात्यांना
आयुष्याच्या ऊन सावलीत
आनंदाने झोके घेऊया
नववर्षाचे स्वागत करू हासत
अनुभवातला उन्हाळा पावसाळा
निसर्ग क्रमाने बदलून जाऊ
आनंदाने गाणी गात जाऊ
निसर्गातली भाजी भाकरी खाऊ
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
0



