Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडासाहित्यगंध

रंगात तुझ्या; बळवंत डावकरे

नांदेड

0 4 8 2 9 0

रंगात तुझ्या

मुखी नाम नि हातात टाळ
रंगात तुझ्या रंगावं म्हणतो
प्रगटून देशील का तू दर्शन
पायी तुझिया माथा टेकतो

कर कटेवर ठेऊन उभा तू
वाहशी भार या इहलोकीचा
भजनात दंग सारे वारकरी
गजर मुखी तुझ्याच भक्तीचा

पायी वारीचे भक्त निस्सिम
मजल दरमजल दिंडी चाले
ओढ भक्ता तुझ्या दर्शनाची
खांदी पताका जयहरी बोले

संगे तयांच्या अधुनमधून
ऊन पाऊस नि थंडी वारा
भरवसा जगाच्या मालका
वाहतो विठोबा भार सारा

श्रद्धा आमची चरणी वाहतो
रंगात तुझ्या दंगले वारकरी
ठेवजो कृपादृष्टी भक्तांवर
ठेचू पातक होऊन धारकरी

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे