0
4
8
2
9
0
पाऊस
भेगाळल्या रानाची या
भागविण्या ही तहान,
गोळा झाले मेघ सारे
हरपून देहभान…!!१!!
उधळीत पाचोळ्याला
आला सोसाट्याचा वारा,
मृदगंध दरवळे
सवे पावसाच्या धारा…!!२!!
झाली ओलेती ही माती
चिंब होऊन थिजली,
नव्या नवती समान
कणकण शहारली…!!३!!
कोसळल्या जलधारा
पाणी वाहे खळखळा,
धरा आकाश मिलन
जणू रंगला सोहळा.,!!४!!
निसर्गाची ही किमया
झाली शीतल ही धरा,
अहंकारी मानवाला
दावी मार्ग तोच खरा…!!५!!
सुनिता नाईक, कुरुळी
ता.खेड,जि.पुणे
0
4
8
2
9
0



