स्वरधारा परिवाराच्या “द गोल्डन मेलोडिज” नी जिंकली श्रोत्यांची मने
नागपूर शहर प्रतिनिधी

स्वरधारा परिवाराच्या “द गोल्डन मेलोडिज” नी जिंकली श्रोत्यांची मने
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि २२) स्वरधारा परिवार, च्यावतीने आयोजित कार्यक्रम बऱ्याच कालावधीनंतर उत्कर्ष सभागृहात अनवट सुरावटीं रसिकांच्या कानी पडल्या आणि रसिकांनी स्वरानंदाची अद्भुत अनुभूती घेतली. निमित्त होते स्वरधारा परिवारातर्फे आयोजित “द गोल्डन मेलोडीज “या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम शनिवारी 21 फेब्रुवारीला, उत्कर्ष सभागृह, हिंदी मोर भवनात सादर करण्यात आला.
कार्यक्रमाची संकल्पना आयोजक, संयोजक व गायक या तिहेरी भुमिकेतील चंद्रशेखर तासगांवकर यांची होती. मानसी बढे हिने सरस्वती वंदना प्रस्तुत केली. त्यानंतर एकाहून एक सुरेल गीते सादर करण्यात आलीत.
मानसी बढे हिने ‘मिला है किसीका झुमका, या गीताने मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर शेखर जोगवार यांनी ‘ओ हंसिनी, मेरी हंसिनी’, वंदना कडू यांनी ‘मै तुमसे पूछती हूं ” रोहिणी पाटणकर यांनी ‘कदर जाने ना, श्रीकांत पैठणकर यांनी, ‘सुहानी चांदणी राते’ श्रद्धा डाऊ यांनी ‘मै तेरे इश्क में ‘व चंद्रशेखर तासगांवकर यांनी “ये जुल्फ अगर खुल के बिखर जाये तो अच्छा” अशी गीते ताकदीने सादर केलीत.
यानंतरही, जा गले से, दिल तो है दिल, तडप ये दिन रात की, जाने बहार तेरा हुस्न बेमिसाल है, सोलह बारस की बाली उमर, दिल चीज क्या है, खिलते है गुल यहाँ, तुझसे नाराज नही जिंदगी, शर्म आती है मगर, ही एकल गीते व आपकी आँखो में कुछ, इतना है तुमसे प्यार मुझे, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे, ओ रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, व तेरे मेरे मिलन की ये रैना ही युगल गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत यांनी गायलेल्या, ‘मै निगाहे तेरे चेहरे से हटाऊ कैसे’ या गाण्यांनी झाला. अशोक गांधी यांच्या माहितीपूर्ण निवेदनाने रसिकांना खिळवून ठेवत कार्यक्रम एका उंचीवर नेला. संजय कुलकर्णी यांनी तांत्रिक सहाय्य केले. एकंदरीत भरगच्च उपस्थितीतील नागपूरकरांना एक आगळावेगळा व विशुद्ध कार्यक्रम ऐकल्याचे समाधान मिळाले.



