0
4
8
3
0
0
काव्यचोर
बापरे!काव्याची पण
करतात कशी चोरी
आता कोणती द्यावी?
शिक्षा मुर्खांना अघोरी….
कोणाच्या हृदयातील
वेदना आणि भावना
चोरी करण्याचे धाडस
करील उध्वस्त जीवना…
लहान असो वा मोठी
पकडली जाते चोरी
का बरं साहित्यातही
दुष्ट खोटी घुसखोरी….
फुकटचे हार तुरे नि
पुरस्कार घेती खोटा
मात्र नियती देणारच
खोट्याच्या पदरी गोटा…
ज्याचे अपत्य चोरी जाते
त्यालाच माहित ते दुःख
काव्यचोर निर्लज्ज कसा
साहित्यिकाचे लुटतो सुख…
राजश्री मिसाळ ढाकणे
ता जिल्हा बीड
==========
0
4
8
3
0
0



