0
4
8
2
9
7
गुंतागुंत
माणूस माणसाला
पारखा झाला,
तो माणुसकी विसरला
प्रश्न चिंतेचा झाला….१
सारीचं गुंतागुंत
माणूस हीन झाला
काय सांगावे नवतीला
प्रश्न काळजीचा झाला….२
अस्थिर समाज,
घेई अनैतिकतेचा आधार
नाही भान कुणास
झाली पिढी बेकार….३
संस्काराचे मोती
ही गुंतागुंत सोडवेल
वाट आयुष्यची
माणुसकी दाखवेल….४
काशीनाथ पैठणकर
जि.नाशिक
=======
0
4
8
2
9
7



