आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
आई गेली संपावर
भुमेश्वरी सातपुते- खोंडे ता. उमरेड जि.नागपूर

0
6
1
1
8
5
आई गेली संपावर
एक दिवस आई
संपावर गेली
चिंगीनच सारी
आवरा सावर केली
सडा घातला उठून
भल्या सकाळी
त्यावर काढली
सुंदर रांगोळी
बाबांना दिला
चहा करून
चिंटूचा दिला
टिफिन भरून
वरण केलं
भात केला
खमंग फोडणी
आंबट ताकाला
चिंगीने केले ताट
दादाने भरले ग्लास
मेथीच्या भाजीचा
घरभर सुवास
चिंगीने स्वयंपाक
केला छान
आई-बाबांना
तिचा अभिमान
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता. उमरेड जि.नागपूर
============
0
6
1
1
8
5



