0
4
8
2
9
3
तुम्हावरच मर्जी..
मिठीत घ्या गौर काया
तुम्हावरच मर्जी राया..
भाव डोळ्यातले जाणा
सांजसमयी गजरा आणा
केसात माझ्या माळाया..
तुम्हावरच मर्जी राया..
उधाण या चांदणरातीला
भेटीस जीव अधीर झाला
मन घायाळ झाले पहाया
तुम्हावरच मर्जी राया..
मन कावरते का बावरते
का अंग अंग हे शहारते
भर उन्हात या भिजवाया
तुम्हावरच मर्जी राया..
यमुना तिरी या एकांती
वेड लावी सावळकांती
या वेणूशी सूर छेडाया..
तुम्हावरच मर्जी राया..
ओठांनी गाल चुंबीले
अन् श्वास ही सैराट झाले
प्रेमाची फुलबाग फुलाया
तुम्हावरच मर्जी राया..
दाटली अनामिक हूरहूर
लाजेने झाले चूर चूर
तृप्तीची लहर पेलाया
तुम्हावरच मर्जी राया…
सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
=========
0
4
8
2
9
3



