Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात नागरी संरक्षण शिबीर संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 4 1 4

जे. एस. एम. महाविद्यालयात नागरी संरक्षण शिबीर संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग, ( दि २१): जे. एस. एम. महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उप-नियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय, उरण -रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये नागरी संरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश विदयार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी तयार करणे हा होता.

या शिबिराचा उदघाटन समारंभ दि 17 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाच्या एन. एस. एस. ऑफिसमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील उप-प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पंकज घरत, प्रा. अश्विनी आठवले, श्री शशिकांत शिरसाट, सहाय्यक उप -नियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण – रायगड, नागरी संरक्षण दलाचे विभागीय क्षेत्ररक्षक श्री भूपेंद्र पाटील, प्रशिक्षक पल्लवी पाटील व एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष Adv. डॉ. गौतमभाई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबीर म्हणजे एक स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

या शिबिरामध्ये श्री शशिकांत शिरसाट, सहाय्यक उप -नियंत्रक, श्री भूपेंद्र पाटील, विभागीय क्षेत्ररक्षक, सौ पल्लवी पाटील, मास्टर ट्रेनर,श्री हरेश्वर ठाकूर, मास्टर ट्रेनर समृद्धी ठाकूर, श्रीमती आसावरी पाटील, सहाय्यक आपत्ती व्यवस्थापण अधिकारी यांनी विदयार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापण याविषयी मार्गदर्शन केले व विविध प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घेतला.
या शिबिरामध्ये, विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व त्याच्या विविध पद्धती, आग प्रतिबंध आणि नियंत्रण, शोध आणि बचाव कार्य, सुरक्षित स्थलांतरण, आणि इतर आवश्यक कौशल्ये शिकवली.

निसर्गनिर्मित आपत्ती व मानव निर्मित आपत्ती याबाबत श्री शशिकांत शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी रस्ते अपघात, बॉम्ब हल्ले व इतर आपत्ती मध्ये जखमी व्यक्तीला उचलून सुरक्षित रित्या स्थलांतरीत करणे याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली. श्री भूपेंद्र पाटील व पल्लवी पाटील यांनी स्ट्रेचर म्हणजे काय त्याचे प्रकार व रुग्णांना किंवा अपघातग्रस्त व्यक्तींना स्ट्रेचरवर ठेवण्याच्या सुरक्षित पद्धती सांगितल्या व उपलब्ध मनुष्यबळ याप्रमाणे दोन व्यक्ती, तीन व्यक्ती तसेच चार व्यक्ती यांच्या सहाय्याने हॉस्पिटल पर्यंत जखमीना कसे न्यावे याच्या विविध पद्धतीची माहिती सांगितली व त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली.

आग लागल्यानंतर जखमी व्यक्तींना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी दोरीचा उपयोग कसा करावा, दोरीच्या विविध प्रकारे गाठी कशा बांधव्यात त्यांचा विविध ठिकाणी वैविध्यपूर्ण उपयोग याविषयी माहिती देऊन प्रत्यक्षिके दाखविण्यात आली.

दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यांनतर समारोप समारंभ घेण्यात आला यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थी कु. तन्वी पाटील, कु. कुंपावत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले कि, नागरी संरक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदी आणि कृतज्ञ आहोत. या शिबिराच्या माध्यमातून आपत्तीच्या काळात स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे अत्यंत उपयुक्त प्रशिक्षण आम्हाला मिळाले.
शिबिरामध्ये प्राथमिक उपचार, आग प्रतिबंध व नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, सुरक्षित स्थलांतर आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे आमच्यामध्ये संकटसमयी योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

या शिबिरामध्ये एकूण 65 एन. एस. एस. स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे असे श्री शशिकांत शिरसाट यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप, वादळ किंवा मानवनिर्मित आपत्ती जसे की आग, औद्योगिक अपघात, दहशतवादी हल्ले या आपत्तीच्या काळात, नागरी संरक्षण शिबिरामध्ये मिळालेले प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे तरी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपत्ती व्यवस्थापण कार्यात हातभार लावावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रमअधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.
या नागरी संरक्षण शिबिराचे आयोजन जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष Adv. डॉ. गौतमभाई पाटील व प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उप-प्राचार्य व एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले व डॉ. पंकज घरत यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे