Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : छत्रीत माझ्या📘*
*🔸मंगळवार : ०८ / जुलै /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*छत्रीत माझ्या*
( बालकविता )

मे महिना संपला
आला पावसाळा
छत्रीचा साऱ्यांना
लागलाय लळा..१

थेंब टपोरे
पाऊस वारे
छत्रीत माझ्या
सारेच यारे…२

पाणीच पाणी
उडवत जाऊ
मजेने पावसाचे
गाणेच गाऊ…३

पाण्यात सारे
सोडुया होड्या
नंतर आपण
मारूया उड्या…४

वेगाने बघा
सुटला वारा
पडल्या त्यात
टपटप गारा…५

नभात दिसे
इंद्रधनू छान
छत्रीला माझ्या
आहे दोन कान…६

अंगी झोंबे वारा
भरे हुडहुडी
छत्रीला आहे
तारेची काडी…७

बेडूक दादाची
असे डराव डराव
छत्रीत माझ्या
नसे त्यास वाव…८

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

थंड थंड, गार गार वारा
पावसाच्या बरसती धारा…

रमत गमत शाळेत चालली
चिंब चिंब पावसात भिजली…

शाळा जवळ येऊ लागली
सोनू तर पावसातच रमली…

वीज कडाडताच भीती वाटली
आता छत्रीची आठवण झाली…

अचानक आले आता लक्षात
छत्री आहे आपल्या दफ्तरात….

छत्री बाई,छत्री बाई उघडली
मोनूलाही मग छत्रीत घेतली….

बाई काय आपल्याला रागावतील
नाही, त्या समजूनच सांगतील..

बाईना माफी मागून मोकळे व्हावे
घरी जाऊन परत पावसात भिजावे
पावसात भिजावे…..

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्रीत माझ्या
येशील ना
पाऊस आल्यावर
खेळशील ना।।१।।

पाऊसा रे पाऊसा
येशील ना
छत्रीत माझ्या
मला नेशील ना।।२।।

छत्रीत माझ्या
शाळेत जाशील ना
पाऊस आल्यावर
रंगीत छत्रीत नेशील ना।।३।।

छत्रीत माझ्या
लपशील ना
लपाछपीचा खेळ
पावसा खेळशील ना।।४।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील*
ता. शहादा जि. नंदूरबार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्रीत माझ्या
येशील का रे तू
पुस्तके माझ्या
धरशील का तू

आपणच जाऊ
दोघे दोघे राहू
आपण दोघे मित्र
आहे चर्चा सर्वत्र

बाबाने माझ्या
आणली छत्री
रंगिबेरंगी फुलांची
आहे ती पत्री

पाणी येतो धो धो
जायचा आहे शाळेत
गडे पाण्यातून
जाऊ आपण खेळत

अभ्यासाचे पुस्तकी
ठेऊ डोक्यावर
थोड्या वेळाने
ठेवायचे पाठीवर

ओले नाही करायचे
ठेवायचे जपून
अभ्यासाच्या वेळी
काढायचे दप्तरातून

छान माझी छत्री
आहे तिच्याशी मैत्री
सावली देते मला
धावून येते संकटाला

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्रीत माझ्या
जमलेय सारे
अंगात शिरले
थंडीचे वारे

एकच छत्री
देईना आधार
पाऊस धारा
सोसेना भार

सुंदर रंगाच्या
उमटल्या छटा
चिखलातूनही
काढल्या वाटा

पाऊस धारा
धावत आल्या
सुसाट वाऱ्यात
बेधुंद न्हाल्या

एकटीच तिही
सर्वाना म्हणाली
छत्रीत माझ्या
जागा मी दिली

संरक्षण करण्या
सदैव सोबत
बचाव करतेय
धो धो पावसात

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*
( बालकविता)

पावसाच्या धारा
गार गार वारा
छत्रीचा निवारा
टप टप वेचू गारा.

या मुलांनो या रे
छत्रीत माझ्या या रे
पावसाच्या थेंबासंगे
नाचू गाऊ सारे .

छत्री माझी लहान
तरी करामत महान
तिच्यामुळे वाढते माझी
मित्रांमध्ये शान.

ऊन पावसामध्ये
तिचीच असते सोबत
म्हणून तर येत नाही
आजारपणाची नोबत.

छत्री माझी फुलाफुलांची
आवडता रंग
ताई करते हेवा माझा
पाहून होते दंग.

अंग चापून चोपून
खुंटीवर बसते लपून
आई म्हणते बाळा
छत्री आण जपून .

*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*छत्रीत माझ्या*

रिपरिप.. ..रिपरिप
पावसाची झळ
छत्रीत आहे माझ्या
झेलण्याचे बळ

मनीमाऊ मनीमाऊ
पावसात नको जाऊ
ये छत्रीत माझ्या
मीच देते तुला खाऊ

उंदीरमामा उंदीरमामा
भिजले का तुझे बीळ
ये छत्रीत माझ्या
नको करू चिडचिड

कावळेदादा कावळेदादा
मोडला का तुझा खोपा
ये छत्रीत माझ्या
इथे नाही मुळी धोका

बंदरमामा बंदरमामा
नको मारू पावसात उडी
ये छत्रीत माझ्या
भरेल तुला हुडहुडी

छत्री जरी लहान माझी
मन आहे खूप मोठे
राहू सर्व आनंदाने
होऊन सर्व छोटे छोटे

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

आषाढातला पाऊस
सारखी झड लागली
शाळेत जायचे आहे
विचार करू लागली

छत्रीत माझ्या चल
सोबतीने जाऊया
करू नको गडबड
शाळा बघ आलिया

छत्रीचा आधार
भर पावसाळ्यात
कुठेही जायला
छत्रीत माझ्या येना

आज तर शाळेत
रंगिबेरंगी छत्र्या
गोल गोल फिरतात
आज उपक्रम घेवुया

रेनकोटपेक्षा तर
छत्रीच छान वाटते
सहज उघडते
सुरक्षित वाटते

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

सोनू आणि मी
वर्गात बसते जवळ
मैत्रीला आमच्या
आहे निस्वार्थी बळ

सोनुची परिस्थिती
आहे खुप गरीबीची
याची जाण ठेवून मी
भावना ठेवते सहकार्याची

शाळा सुरू झाल्या
पावसाळा सुरू झाला
होऊ. लागला सोनुचा
दप्तर,फ्राक ओला

मी म्हटले सोनुला
चिंता नको करू
छत्रीत माझ्या आपण
दोघीजणी सावरू

सोनुला वाटले वाईट
पण झाली ती तयार
छत्रीत माझ्या आम्ही
शाळेत येतो शानदार

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्रीत माझ्या या
कोण कोण येते,कोण कोण येते
सोनू येतो नि मोनु येतो
शाळेला मला सोबत होते

छत्रीत माझ्या मज्जाच येते
टपटप पाऊस आवाज देते

छत्रीत माझ्या या
कोण कोण येते,कोण कोण येते
दादा येतो नि ताई येते
चॉकलेट,बिस्कीट खायला देते

गंपू येतो नि चंपू येते
सोबत बसून अभ्यास करते

छत्रीत माझ्या या
कोण कोण येते,कोण कोण येते
डब्बा येतो नि दप्तर येते
अभ्यास करून जेवायला मिळते

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

शाळेत चालले मी
सोबत पाऊस ही आला..
बिचारा बेडुक दादा
चिंब भिजला..
टुनटुन उडी मारत
माझ्या पाठी लागला…
छत्रीत माझ्या येऊन
थांबला…

छोटीशी खारूताई
पळते भरभर..
जोरदार पाऊसात
तिचे हरवले घर..
छत्रीत माझ्या मी
घेतले तिला ही…
आडोसा मिळताच
ती नाचली थुई थुई…

मग भेटला
खेकडे दादा मला..
भिजून भिजून तो
होता गारठला…
छत्री देता माझी
तो किती आनंदला
आनंदात बाई मलाच
कचकन चावला..

सगळ्या गोंधळात
आठवली शाळा..
बापरे, मला बराच
उशीर झाला..
त्यामुळे बाईंचा मी
ओरडा ही खाल्ला….
पण आईच्या मदतीचा धडा
मी तंतोतंत पाळला..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्रीत माझ्या बेडूक आला
डराव डराव करू लागला
पावसात भिजून सर्दी होईल
छत्रीत घ्यायला विनवू लागला

हात पुढे करताच आनंदी झाला
उडी मारून खांद्यावर बसला
इकडे तिकडे रूबाबात पाहून
गालातल्या गालात खुदकन हसला

छत्रीत माझ्या चिमणी आली
पंख भिजून हुडहुडी भरली
नेऊन सोड मला माझ्या घरी
दाखवते तुला दोन दोन पिल्ली

हो म्हणताच खांद्यावर बसली
पंख झटकून गोड गोड हसली
चिवचिव पिलांची कानी पडताच
भुर्रकन उडून खोप्यात शिरली

माझ्या छत्रीत मांजर घुसली
वाघाची मावशी चांगलीच भिजली
चल घरी जाऊ मला म्हणाली
म्याँव म्याँव करत पायात घुटमळली

उचलून तिला खांद्यावर घेतली
गुरगुर गुरगुरत कानाला चिटकली
गालाला नाक घासू लागली
पावसात फिरण्याची मजाच आली

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

रिमझिम पावसाची
आहे सुरु संततधार
ओला चिंब वारा
वाहतोय गारेगार

पावसाळ्यात असतो
छत्रीला खूप मान
रंगीबेरंगी रंगात छत्र्या
दिसतात खूप छान

पण माझ्या कडे आहे
जुनी काळी मोठी छत्री
माझ्या आईला वाटतं
देते ती सुरक्षेची खात्री

पावसात भिजल्याने
मला होतो सर्दी ताप
मला निजलेलं पाहून
आईला लागतो धाप

आई देते मला मग
बाटलीतील औषध कडू
नकोच वाटतं पितांना
मला येतं खूप रडू

म्हणून म्हणतोय मित्रानो
यारे छत्रीत माझ्या सारे
छत्रीत मिळून गाऊया
पावसाचे सुंदर गाणे.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

छत्री माझी काळीभोर
दांडा तिचा लांब घोर
देता मी बटणावर जोर
पटकण फैलते डोक्यावर ।।

डोक्यावर… घेवून छत्री माझी
छत्रीत माझ्या मित्रांची गर्दी
ओले होण्याची भीती असते
पण तेवढीच आम्हाला मज्जा येते ।।

गढ्ढ्यावरूनही चालत असतो
वार्‍याच्या दिशेला तिला झुकवतो
खडे दगड… पाण्यात मारतो
पावसाची खुप खुप मज्जा घेतो ।।

दप्तर पुस्तकांची काळजी नसते
गणवेशाचीही पर्वा नसते …
चालता चालता गप्पा रंगतात
साप,बेडकाच्या आठवणी निघतात ।।

आठवणींना मग त्या शेपूट फुटते
पाहता पाहता घर गाठते…
बालपणीच्या आठवणी स्मरणात राहतात
एकट्यातही मग त्या हसू फोडतात ।।

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*छत्रीत माझ्या*

टप टप टप
पाऊस धारा
छत्रीत माझ्या
खेळतो वारा…

पाऊस पाणी
छत्र्यांचा वार
वाटेत भेटले
दोस्त चार …

हिरवी झाडी
पाण्याचा पाट
पाणी उडवत
चालतो वाट…

खळखळ ओढा
साद घालतो
छत्री मधून
पाऊस गातो…

टपोर थेंबाचा
पाऊस गार
छत्रीत माझ्या
मज्जा फार…

*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔💦☔♾️♾️♾️♾️
*📗साप्ताहिक साहित्यगंध अंक क्र १७७ साठी विजेत्यांनी आजच साहित्य पाठवावे.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे