Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरब्रेकिंगवर्धाविदर्भ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा 5 तारखेच्या शाळा बंद आंदोलनास जाहीर पाठींबा

वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांचे आवाहन

0 4 8 2 8 2

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा 5 तारखेच्या शाळा बंद आंदोलनास जाहीर पाठींबा

वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

वर्धा (दि २ डिसें.) : प्राथमिक, माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संटनाचा समन्वय जिल्हा वर्धाच्या वतीने व राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर ला शाळा बंद आंदोलन मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनास जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

अन्यायकारक संच मान्यतेच्या आडून शाळा शिक्षकांमुक्त करणे, व TET च्या माध्यमातून शिक्षकांना नोकरीतून मुक्त करणे अशा दुहेरी संकटात शिक्षक बंधू सापडल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने वर्धा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने येत्या दिनांक 5 डिसेंबर च्या शाळा बंद आंदोलनास जाहीर पाठीबा देऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार, जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील, पवन झटाले, नितेश कालपांडे, आर पी थुल, राजेश नंदा गवळी, देवांआनंद ताकसांडे विशाल गावन्डे, श्रीकृष्ण भस्मे, योगीराज पाटील आदिनी कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे