‘जेम्स प्रिंसेप’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने…!!!
सविता धमगाये ता जि.नागपूर
‘जेम्स प्रिंसेप’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने…!!!
‘दान पारमिता फाउंडेशन’ ही एक नावाजलेली संस्था आहे. जी लेणी संवर्धन, संशोधनावर काम करते. अशोककालीन धम्मलीपीचे आनलाईन वर्ग आयोजित करून धम्म लिपीचा प्रचार प्रसार करते. नुकताच या फाऊंडेशन तर्फे अशोकन स्क्रिप्ट इंस्टिट्यूट अंतर्गत जेम्स प्रिंसेप यांची जयंती साजरी करण्यात आली. आता हा जेम्स प्रिंसेप कोण आणि त्याची जयंती का साजरी करायची. प्रश्न पडला ना. तर मित्रांनो जेम्स प्रिंसेप हा एक इंग्रज अधिकारी होता. इंग्लंड मध्ये 20 आगस्ट 1799 मध्ये जन्मलेला प्रिसेंप तरूण वयातच भारतात अधिकारी म्हणून आला. प्रिसेंपचे व्यक्तीमत्व विलक्षण होते. एखाद्या गोष्टीत लक्ष घातले की ती पूर्ण करण्याचा खाक्या होता त्याचा. त्याला टाकसाळीमध्ये काम करीत असतांना काही प्राचीन युनानी सिक्के आढळले. ज्यावर युनानी सोबत आणखी एक लिपी होती. त्या लिपीचे त्याने सखोल संशोधन केले. बरीच पायपीट केली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की ही लिपी म्हणजे प्राचीन अशोककालीन वापरात असलेली धम्मलीपी होय. ही सम्राट अशोक यांच्या आधीही वापरात होती.
मग काय जेम्स प्रिंसेप ने लेणी वरील लिपी वाचण्याचा समजून घेण्याचा सपाटाच लावला. त्याबरोबरच त्याने बनारस शहराचा कायापालट केला. बनारस शहराचा नकाशा हा जेम्स प्रिंसेप यांनी तयार केलेला आहे. आणि तो सर्वाधिक प्रमाणित मानल्या जातो.पण त्याची खरी ओळख झाली ती त्याच्या खरोष्टी लिपी आणि धम्मलिपीच्या शोधकार्यामुळे. त्याने आपल्या शोधाने सम्राट अशोक, सातवाहन, चालुक्य आणि मौर्य घराण्याचा इतिहास जगासमोर आणला. ज्याचा उपयोग पुढे जाऊन कनिंघगम यांना झाला. मग आहे की नाही जेम्स प्रिसेंप विलक्षण. काही तज्ञ असे म्हणतात की जगातील पहील्या दहा विलक्षण व्यक्तीमध्ये जेम्स प्रिंसेप यांचा समावेश व्हायला पाहिजे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली आम्हाला धम्म दिला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची आणि अधिकाराची जाणिव व्हायला लागली.
आमची पावले इतिहासाकडे वळू लागली. बाबासाहेबांचे बोट धरून धम्माकडे वळलो आणि बुद्ध धम्म संंघ समजून घेऊ लागलो. तर अशा या धम्मलीपीचे संशोधन आणि संवर्धनासाठी तसेच जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दान पारमिता फाउंडेशन’ झटून कार्य करते. दिनांक 20/08/2025 रोजी जेम्स प्रिंसेप यांची जयंती परशूराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे साजरी करण्यात आली. इथे इतिहासतज्ञ, लिपीतज्ञ आ. अतुल भोसेकर यांनी धम्मलीपी बद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली. प्रा. अशोक शेजवळ यांनी पोवाड्यातून भिमगर्जना केली आणि आ. नागार्जुन वाडेकर यांनी महत्वपूर्ण माहीती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. जयश्री खरे /बागूल ताई यांनी अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले.संस्थेचे संस्थापक आ. सुनिल खरे यांच्यासोबत संतोष आंभोरे, प्रविण जाधव आणि रूपाली गायकवाड यांचे योगदान अवर्णनीय आहे.पुढे जाऊन इतिहास संवर्धक म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जाईल. जेम्स प्रिसेंप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मला धम्म रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दल मी आयोजकांचे कायम आभारी राहीन. शेवटी पुरस्कार हे नुसते प्रेरणा देत नाहीत तर जबाबदारीची जाणीव करून देतात.
सविता धमगाये
ता जि.नागपूर
=======



