काँग्रेस कमिटीसमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर
काँग्रेस कमिटीसमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कारखान्याने शेतकऱ्याचे थकवले बिल
जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर
सोलापूर : सन २०२३-२४ मध्ये मातोश्री शुगर को जनरेशन रूद्रवाडी (दुधनी), अक्कलकोट, या कारखान्याने ऊस घेऊन गेली ८ महिन्यापासून अद्यापपर्यंत एकही रूपया शेतक-याच्या बैंक खात्यामध्ये जमा केलेली नाहीत. तसेच काही शेतक-यांना ५०० व १००० रू प्रतिटनाप्रमाणे बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत.
हा कारखाना काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा असून २९ जुलै २०२४ रोजी त्याच्या घरा समोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सिध्दाराम म्हेत्रे यांनी ३ ऑगस्ट रोजी टनाला २७००/- रू प्रमाणे असे लिखित पत्र दिले. पण अद्यापपर्यंत काही शेतक-यांना टनाला ५००/- रू प्रमाणे, काहींना ७००/- रू प्रमाणे त्यांच्या बैंक खात्यावरती जमा करण्यात आले. तर बहुतांश शेतक-यांना अद्यापर्यंत एकही रूपया त्यांच्या बैंक खात्यामध्ये जमा केलेले नाही.
या कारणामुळे काँग्रेस भवन, सोलापूर, जुने कलेक्टर ऑफिस समोरिल येथे ०४ सप्टेंबर २०२४ वार बुधवार अनेक शेतक-यासह आमरण उपोषण सुरू केले. शुगर अॅक्ट कंट्रोल प्रमाणे ऊसाचे बील १५ दिवसामध्ये देणे बंधनकारक असताना सिध्दाराम म्हेत्रे माजी राज्यगृहमंत्री यांनी “सद रक्षणाय खल निग्रहणाय व सत्यमेव जयते” या वाक्याला धाब्यावर बसवुन शेतक-याला फसवणा-या कारखानदाराच्या विरोधात आमरण उपोषण करत आहोत. अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.



