महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींसाठी आनंदोत्सवाची पर्वणी; दि.७ मे रोजी ‘गौरव अभिजात मराठी’
छत्रपती संभाजी नगर येथे होणार माय मराठीचा गजर
महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींसाठी आनंदोत्सवाची पर्वणी; दि.७ मे रोजी ‘गौरव अभिजात मराठी’
छत्रपती संभाजी नगर येथे होणार माय मराठीचा गजर
आमदार मा. विक्रम काळे अध्यक्षपदी तर तथा उद्घाटक मा. डाॅ. पद्मा जाधव वाखुरे यांची उपस्थिती
शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, मा. नरेश शेळके व आयोजक ए बी पठाण करणार मार्गदर्शन
तब्बल २२ पुस्तकांचे प्रकाशन.. जागतिक विक्रम होणार
राज्यस्तरीय भव्य काव्यवाचन स्पर्धा.. तब्बल ६० कवींचा सहभाग
प्रा. तारका रूखमोडे,
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ गोंदिया/ छत्रपती संभाजी नगर: (दि. ४ मे): मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ७ मे २०२५ रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह’ या ठिकाणी अगदी भव्यदिव्य थाटात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यरुचक आमदार मा.विक्रम काळे हे भूषवणार आहेत. उद्घाटक मा.डाॅ.पद्मा जाधव व शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव व यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव मा.नरेश शेळके, बुलढाणा, आयोजक ए बी पठाण तथा विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे, अरविंद उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे.
यामध्ये पहिल्या सत्रात तब्बल २२ काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून ‘गौरव अभिजात मराठी विशेषांक २०२५’ चे प्रकाशन तथा मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे सर्व साहित्यिकांचा कौटुंबिक सत्कार सोहळा व दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत निमंत्रित ६० कवींचे कवी संमेलन पार पडणार आहे. मराठी साहित्यप्रेमींसाठी व जनतेसाठी ही एक आनंदोत्सवाची पर्वणी ठरणार आहे.आयोजकांनी सुमारे २०० ते २५० लोकांची आसन व भोजन व्यवस्था केलेली आहे.
शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे आजवर अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहे. यातूनच अनेक मोठ्या साहित्यिकांनी मराठी भाषेला समृद्ध असा वारसा मिळवून दिलेला आहे. हेच साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे व भाषेचे संवर्धन सक्षमीकरण व्हावे, नवोदित साहित्यिकांना याची गोडी लागावी व भाषेची अस्मिता उंचवावी यादृष्टीने मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांची तळमळ असते. म्हणून सर्व साहित्यिकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हा सोहळा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा गौरवशाली सोहळा आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत व एकावेळी २२ पुस्तकांचे प्रकाशन हा विश्वविक्रम देखील ठरेल अशीही चर्चा सर्वत्र होत आहे. तर या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समिती छत्रपती संभाजीनगर तर्फे करण्यात येत आहे.
“या” साहित्यिकांच्या कविता संग्रहाचे होणार प्रकाशन
१) कवयित्री सौ. सोनाली सहारे रायपुरे
ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर
२) कवयित्री सौ. सिंधू बनसोडे
ता. इंदापूर, जि. पुणे
३) कवयित्री सौ. स्वाती मराडे आटोळे
ता. इंदापूर, जि.पुणे
४) कवयित्री सौ. संध्या पाटील
अंकलेश्वर, भरूच (गुजरात)
५) कवयित्री सौ. सुरेखा चित्ते
ता. श्रीवर्धन, जि. रायगड
६) कवयित्री सौ. राजश्री ढाकणे मिसाळ
ता. जिल्हा बीड
७) कवयित्री सौ. शर्मिला देशमुख घुमरे
ता. केज, जि. बीड
८) कवयित्री सौ. भावना इटकीकर गोटे
ता. जिल्हा अकोला
९) कवयित्री सौ. सारिका मोरे
ता.वाई, जि.सातारा
१०) कवयित्री डॉ. पद्मा जाधव वाखुरे
जि.छत्रपती संभाजीनगर
११) कवयित्री मायादेवी गायकवाड ठोकळ
ता. मानवत, जि.परभणी
१२) मा. श्री. अशोक फोपसे
ता.नेवासा, जि.अहिल्यानगर
१३) मा. श्री. विजय शिर्के
वाळूज, जि.छत्रपती संभाजीनगर
१४) मा. श्री. पंकज चारथळ
कोराडी रोड, जि. नागपूर
१५) मा. श्री. मंगेश पैंजने
ता. मानवत, जि. परभणी
१६) मा. श्री. दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
ता. जि. धाराशीव
१७) मा. श्री. अरविंद उरकुडे
ता. जि. गडचिरोली
१८) कवयित्री सौ. माधुरी काळे कावडे
ता. वणी, जि.यवतमाळ
१९) मा. श्री. गोवर्धन तेलंग
ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ
२०) मा. श्री. प्रकाश गोधने
ता.कंधार, जि. नांदेड
२१) कवयित्री वर्षा मोटे पंडित
जि.छत्रपती संभाजीनगर
२२) कवयित्री सविता क्षीरसागर
ता. वाई,जि.सातारा
सहभागी होणारे निमंत्रित काव्यस्पर्धक
१ प्रज्ञा सवदत्ती
२ राजश्री ढाकणे
३ बी एस गायकवाड
४ गणेश पाटील
५ आशा कोवे गेडाम
६ अजय टेकाले
७ अनिता व्यवहारे
८ प्रदीप विघ्ने
९ ज्योती चारभे
१० वनिता लिचडे
११ संध्या पाटील
१२ अर्चना इंकने
१३ मायादेवी गायकवाड
१४ वसुधा नाईक
१५ सिमादेवी बेडसे
१६ डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
१७ सुरेखा चित्ते
१८ सविता धमगाये
१९ भावना इटकीकर
२० कुसुमलता वाकडे
२१ बलवंत डावकरे
२२ सुनिता नाईक
२३ विवेक पाटील
२४ पुष्पा डोनीवार
२५ गोवर्धन तेलंग
२६ निर्मला मचाले
२७ सिंधू बोदेले
२८ मंगेश पैंजने
२९ तनु भोयर
३० पंकज चारथल
३१ सिंधू बनसोडे
३२ शबनम काझी
३३ सुनंदा किरसान
३४ पांडुरंग मुंजाळ
३५ सुधाकर भुरके
३६ आशालता सोनवणे
३७ अस्मिता हतीअंबिरे
३८ हर्षा सहारे
३९ इंदू मुडे
४० वर्षा मोटे पंडित
४१ नागोराव सोनकुसरे
४२ प्रकाश गोधने
४३ अनिल मेश्राम
४४ सविता क्षीरसागर
४५ सारिका मोरे
४६ सारिका गेडाम
४७ कु तेजश्री सरोदे
४८ इंदुमती कदम
४९ दत्ता काजळे
५० शैला शिंदे
५१ शिवाजी नामपल्ले
५२ दादाराव काटकर
५३ सोनाली सहारे
५४ विजय शिर्के
५५ डॉ पद्माताई जाधव
५६ रवींद्र पाटील
५७ केवलचंद शहारे
५८ सुलोचना लडवे
५९ भारती धनवे
६० मीनल भोयर





