Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजन

आवास मध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

आवास मध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: (दि. १ मे २०२५): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.

सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद दिपक राऊळ यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी परेड करून आमंत्रित केले व सभासद दिपक राऊळ यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. प्रतिज्ञा झाली. त्यानंतर विशाल पाटील सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले. त्याला यतिश शिंदे सर यांनी तबला साथ केली. त्यानंतर इ. ५ वी च्या स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेली विद्यार्थीनी साईशा संदेश राणे हिचा तसेच पंचायत समिती, अलिबाग [ शिक्षण विभाग ] व तालुका आरोग्य अधिकारी, अलिबाग – रायगड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन करणाऱ्या दिव्या सदानंद पाटील या विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी जेष्ठ शिक्षक महादेव कोळी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील कार्यक्रमानंतर ग्रुप – ग्रामपंचायत, आवास येथे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व प्रथम तेथे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. प्रतिज्ञा झाली. त्यानंतर विशाल पाटील सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले. त्याला यतिश शिंदे सर यांनी तबला साथ केली.

या कार्यक्रमास ग्रुप – ग्रामपंचायत सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक जयेश पाटील, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आवास ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे