‘फाशी द्या फाशी’, बदलापूर येथील चिमुकलीला न्याय द्या…!
तीन हजार विद्यार्थींनींचा निषेध मोर्चा
‘फाशी द्या फाशी’, बदलापूर येथील चिमुकलीला न्याय द्या…!
तीन हजार विद्यार्थींनींचा निषेध मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड: आष्टी तालुक्यात कडा शहरातील जवळपास तीन हजार विद्यार्थींनी यांनी एकत्रीत येऊन कडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध शांतेत करण्यासाठी आज (दि २६) रोजी कडा शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी यांनी एकत्रित येऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हजार विद्यार्थींनी एकत्रीत येऊन केला बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला.
बदलापूर आणि कोलकाता येथील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून या घटनेतील आरोपींना जलदगतीने न्यायप्रक्रिया चालवून शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे यापुढे महिलांवर अत्याचार होणार नाहीत, यासाठी संपूर्णपणे सामाजिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. फक्त बेटी बचाव , बेटी पढाव असा शाब्दिक नारा न देता मुली , महिला समाजात निर्भयपणे फिरू शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. या मागणीसाठी कडा येथील सर्व शाळा, महाविद्यालयातील मुलींनी काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला.