Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखबीडब्रेकिंगमराठवाडासाहित्यगंध

निसर्गाचे अनमोल संगीत -किलबिलाट:शर्मिला देशमुख

'मंगळवारीय आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 8 2

निसर्गाचे अनमोल संगीत -किलबिलाट:शर्मिला देशमुख

‘मंगळवारीय आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण

किलबिलाट असावा जसा घरात मुलांचा
तसाच चिवचिवाट अंगणी पक्षांचा
होईल प्रसन्न मन शरीर आणि पर्यावरण
लुटता येईल आनंद मग जगण्याचा

निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट आणि घरात मुलांचा किलबिलाट असल्याशिवाय दोन्हीही अपूर्णच “ज्या घरात मुलांचे वास्तव्य नाही ते घर नेहमी शांत, अप्रसन्न वाटते. जणू घरातील चैतन्यच हरवले आहे. घर कसे खायला उठते तसेच शाळेतही.. विद्यार्थ्यांशिवाय शाळा म्हणजे विराणीच… शाळा सुटल्यानंतर कधी पाच मिनिटे शाळेत थांबून पहा म्हणजे दिवसभर दंगा मस्ती करणारे विद्यार्थी त्यांचे महत्त्व समजेल आणि ज्यांना लहान मुले आवडत नाहीत त्यांना नक्कीच आवडायला लागतील. उगाच शाळेचे वैभव ते चिमुकले म्हणत नाहीत. घरातही मुले, नातवंडे यांचा मनमुक्त वावर असेल तरच घराला घरपण येते.आता हे घरपण टिकवायचे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती टिकवणे आवश्यक आहे. सध्याच्या यांत्रिक युगामध्ये कुठे हरवली ती दंगामस्ती आणि किलबिलाट.कुठे हरवली ती माळवदावरची अंधाऱ्या रात्रीतील चांदण्याची मैफिल आणि त्यात आजी आजोबांसोबत रंगलेल्या गप्पा गोष्टी, ऐतिहासिक दाखले त्यातून घडणारे संस्कार.आज हरवत चाललेली संस्कृती आणि मोबाईल, इंटरनेट मध्ये हरवत चाललेले बालपण त्याबरोबर लुप्त होत चाललेले संस्कारक्षम शहाणपण… कुठे शोधावे ते सुट्टीत आणि सुट्टी च्या दिवशी निसर्गासोबत बालचमूचा होणारा किलबिलाट आणि त्यांच्या आवाजाने गोंगाटाने आनंदून पक्ष्यांचा होणारा चिवचिवाट.

आज निसर्गातील चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यापेक्षा अनैसर्गिक मोबाईल मधील संगीत ऐकण्यात आजची पिढी धन्यता मानते. निसर्ग म्हणजे काय? निसर्गाला समजून घेणे म्हणजे काय? निसर्गात जगणे म्हणजे काय ?निसर्ग सोबती म्हणजे काय ? निसर्ग वाचणे म्हणजे काय? निसर्ग संवर्धन म्हणजे काय?या गोष्टींपासून आजचा समाज कोसो दूर केला आहे. स्वार्थ, पैसा आणि एकमेकांसाठी नसणारा वेळ त्यामधून होणारे निसर्ग आणि स्वतःच्या पाल्यांकडे दुर्लक्ष या गोष्टीचे विपरीत परिणाम मानव जातीवरच नाही तर पर्यावरणावर ही होत आहेत. आणि आपसूकच मानवाची वाटचाल विनाशाकडे होत चालली आहे. निरपेक्ष आनंद देणारा निसर्ग, चिवचिवाट, किलबिलाट आज कुठेतरी हरवत चालला आहे.

कुठेतरी या गोष्टींचा शोध घेणे आणि आजच्या पिढीला शोध घेण्याची सवय लावणे आवश्यक आहे.तरच खरा निर्भेळ आनंद घेऊन निसर्गासोबत जगणे म्हणजे काय उद्याच्या पिढीला समजेल आणि निसर्ग बहरेल. आज हरवत चाललेली नाती, संवाद पुन्हा एकदा नव्याने जपण्याची आवश्यकता आहे ते काम नक्कीच मुलांच्या किलबिलाटाने आणि चिमण्यांच्या चिवचिवाटाने शक्य होईल पण गरज आहे जपण्याची मग ते नाती असोत वा निसर्ग.

आज मराठीचे शिलेदार समूहात ‘मंगळवारीय बालकवी’ स्पर्धेचा विषय किलबिलाट देण्यात आला आणि वयाने मोठे जरी असले तरी मनाने लहान असणारे आमचे मराठीचे शिलेदार समूहामधील शिलेदार समूहामध्ये किलबिलाट करू लागले. आज शिलेदारांच्या बालकल्पनांमध्ये मुले ,फुले ,शाळा ,निसर्ग, चिमण्या, पशुपक्षी तसेच मोबाईल आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम सर्वच प्रकर्षाने जाणवले.राहुल दादा म्हणजे जणू विविध कल्पनांचे आगारच.सर्वांच्या कल्पनांना चालना देण्याचे काम ते सहज साध्य करतात.आज या किलबिलाटामध्ये हरवून जाऊन परीक्षण लिहिण्याची संधी राहुल दादांनी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार.. सर्व शिलेदारांना निसर्ग व नात्यांचा किलबिलाटामध्ये हरवण्याच्या शुभेच्छा देऊन तूर्तास थांबते. धन्यवाद….!!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक,कवयित्री,सहप्रशासाक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे