उमरेड येथे पार पडला नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार व प्रबोधन समारंभ
उमरेड शहर प्रतिनिधी, रजत डेकाटे
उमरेड येथे पार पडला नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार व प्रबोधन समारंभ
‘मरावे परि – नेत्ररूपे उरावे’; या उक्तीप्रमाणे कार्य हीच खरी श्रद्धांजली; डॉ.शिरीष मेश्राम
उमरेड शहर प्रतिनिधी, रजत डेकाटे
नागपूर/ उमरेड : ‘मरावे परि – नेत्ररूपे उरावे’ या उक्तीला सार्थ करून मरणोत्तर नेत्रदान केलेल्या कुटुंबीयांचा सत्कार हीच खरी त्यांच्या प्रति श्रद्धांजली ठरेल व हा संदेश घरोघरी पोहचविण्याचे भगीरथ कार्य हे प्रबोधन करेल असा विश्वास बालरोग तज्ञ डॉ.शिरीष मेश्राम यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवडा निमित्त नेत्रसंपदा उमरेड, सक्षम केंद्र उमरेड व युथ फाउंडेशन उमरेड यांच्या वतीने आयोजित नेत्रदान जनजागरण सभा व सत्कार समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
स्थानिक जीवन विकास वनिता विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात नेत्रासंपदा संयोजक ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. शशिकांत जयस्वाल, विदर्भ प्रांत संयोजक सक्षम, आशुतोष देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष सक्षम डॉ.सूरज नागोसे,जीवन विकास वनिता विद्यालय च्या मुख्याध्यापिका वर्षा टोंग युथ फाऊंडेशन उमरेडचे उपाध्यक्ष रितेश राऊत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी , बंडू शिंदे, दत्तात्रय तोटवार, मांगो लेंडे, राम तांबडे, , वसुधा खंते, अल्का रेवतकर ,प्रकाश जुमडे,अरविंद हजारे, मनोहर तोंडे,अनुराग बोकडे, , युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मागील वर्षभरात स्व. वा.डो.बाकडे सर यांचे देहदान व स्व.शकुंतला बालपांडे, स्व.भैयाजी जोधें, वसंतराव कर्णेवार यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या आप्तस्वकियांचा डॉ .मीनाक्षी बाकडे,नरेंद्र बालपांडे ,तुषार कर्णेवार,विनोद जोधे यांचा याप्रसंगी मंचासिन मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बुबूळाचे अंधत्व दूर करण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान चळवळ ही काळाची गरज आहे व या चळवळीला लोकसहभागातूनच यशस्वी करता येईल यात विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरेल असे आपल्या प्रास्ताविकातून डॉ. शशिकांत जयस्वाल यांनी सांगितले. स्व .वा. डो. बाकडे यांच्या मागील 20 वर्षाच्या नेत्रदान जनजागृती चळवळीसाठी केलेल्या कार्याचा उजाळा याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन समर भगत यांनी केले व आभार रितेश राऊत यांनी मानले. यशस्वीेसाठी प्रांजल डहाके, पवण मडावी, हितेश गडबोरिकर, श्रीकांत बोरकर,जय मुलचंदानी,मनीष बालपांडे, आदींनी परिश्रम घेतले.



