मालेवाडा येथे जि. प. शाळेत शिक्षक दिन साजरा.
भिवापूर/मालेवाडा, रजत डेकाटे
मालेवाडा येथे जि. प. शाळेत शिक्षक दिन साजरा.
भिवापूर/मालेवाडा, रजत डेकाटे
नागपूर: भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती सहारे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रेखचंद मेश्राम व तर प्रमुख पाहुणे सरपंच राखी इंगोले व उपसरपंच फुलचंद मेश्राम हे होते. शासनाच्या परिपत्रकानुसार 5 सप्टेंबर हा दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन म्हणून शासनाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन अभियानातून शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन म्हणून सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकवले.
पहिली ते पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून अध्यापन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामु लाखे, नागरिक गावातील रजत डेकाटे, अरुण रामटेके, संदीप राऊत शुद्धोधन राऊळ, चरण शेंडे, प्रदिप गेडाम, शाळेतील शिक्षिका भुमेश्वरी सातपुते, शिक्षिका वर्षा कश्यप, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम यावेळी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिक शिला रोडे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा चापले यांनी तर आभार शिक्षक सुरज येल्ले यांनी मानले.



