Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

अंधारयात्री

बी. एस. गायकवाड

0 4 8 2 9 0

अंधारयात्री

अंधकारमय जीवन होते,
चाचपडत होतो अंधारात..
मानव असून मानवतेचा,
लवलेश नव्हता जीवनात… !!१!!

पशुतुल्य जीवन जगायचं,
नशिबी आमच्या ठरलेलं..
गावकुसा बाहेर राहायचो,
अज्ञान अंधकार पडलेलं… !!२!!

अंधारयात्री बनून प्रवासी,
प्रतीक्षा होती ज्ञानसूर्याची..
पिढ्यान् पिढ्या काळोख,
दूर केला किमया भीमाची…!!३!!

भारतीय संविधान लिहून,
दिलाय शिक्षण अधिकार..
मनसोक्त ज्ञानामृत प्राशन,
केला अज्ञानाचा प्रतिकार…!!४!!

प्रकाशात न्हावून निघालो,
दूर पळालाय तो अंधकार..
दाही दिशा मोकळ्या त्या,
बा’भीमाचेच थोर उपकार…!!५!!

बी. एस. गायकवाड
पालम, जि.परभणी
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे