सुप्रसिद्ध हास्य कवी,वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची भेट
पुण्यात लाभले सौभाग्य कवी भेटीचे
सुप्रसिद्ध हास्य कवी,वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची भेट
पुण्यात लाभले सौभाग्य कवी भेटीचे
संगीता पांढरे, पुणे
पुणे: (दि.२३): मेडिकोज गिल्ड बारामती यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तांबे सभागृहात हास्य कवीसंमेलनात आदरणीय रामदास फुटाणे सर, ज्येष्ठ कवी शशिकांत शिरोडकर,आणि हास्य विडंबनकार अनिल दिक्षित सर यांच्या ‘हास्योत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत विडंबनात्मक असे अतिशय बहारदार सादरीकरणाने तिघांनीही बारामती रसिक श्रोत्यांची मने जिंकली . यावेळी मराठीचे शिलेदार समुहाचे प्रशासक राहुल पाटील सर यांच्या ओळखीने इंदापूरच्या कवयित्री सौ.संगीता सुरेश पांढरे यांना या महान भेटीचा सुवर्णयोग जुळून आला. सौभाग्य म्हणावे असेच काही आज झालेल्या भेटीत रामदास फुटाणे यांच्याशी भेट झाली आणि माझ्या पुढील काव्यसंग्रहाबाबत चर्चा केली.





