Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईसंपादकीय

‘मराठा सेवा संघ’ प्रणित राष्ट्रीय ‘जिजाऊ ब्रिगेड’चे पहिले अधिवेशन सूरतच्या भूमीत उत्साहात संपन्न

प्रदेशाध्यक्ष, सविता पाटील ठाकरे यांनी साकारलेल्या जिजाऊंच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले

0 1 8 3 0 8

‘मराठा सेवा संघ’ प्रणित राष्ट्रीय ‘जिजाऊ ब्रिगेड’चे पहिले अधिवेशन सूरतच्या भूमीत उत्साहात संपन्न

प्रदेशाध्यक्ष, सविता पाटील ठाकरे यांनी साकारलेल्या जिजाऊंच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या अधिवेशनाचे आयोजन

गुजरात बिनधास्त न्यूज नेटवर्क

सूरत: ‘मराठा सेवा संघ’ प्रणित राष्ट्रीय ‘जिजाऊ ब्रिगेड’चे पहिले अधिवेशन गुजरात राज्यातील सूरत शहरात दोन दिवस उत्साहात संपन्न झाले. संपूर्ण भारत देश व विविध राज्यातून महिला शक्तीचा खऱ्या अर्थाने जागर झाला. मातृशक्तीला वंदन करणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब, प्रसिद्ध उद्योजक प्रतिराम पाटील साहेब, त्यांच्या धर्मपत्नी मंगलाताई पाटील सुरत शहराचे उपमहापौर डॉ. नरेंद्र पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव वनिताताई काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघ, गुजरात द्वारा आयोजित या कार्यक्रमात गुजरात मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष, भाऊसाहेब पवार डॉ. गिरीश ठाकरे आदींचे अमूल्य असे योगदान लाभल्याने हे अधिवेशन जल्लोषात यशस्वी झाले. दिनांक ३१/०८,२०२४ रोजी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतातील विविध राज्यातून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संस्कृतीचे दर्शन घडवले. यात धुळे इथून आलेल्या प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी भारतीय स्त्री नवरत्न ही सुंदर नाटिका प्रस्तुत केली. यात सिलवासा, दादरा नगर हवेलीच्या प्रदेशाध्यक्षा सविता पाटील ठाकरे यांनी जिजाऊंची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुजरातमधील सुरत येथील मोहोळ येथे मराठा सेवा संघांतर्गत राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.निर्मला पाटील, सुरत शहराचे उपनगराध्यक्ष डॉ.नरेंद्र पाटील, स्वागताध्यक्ष शिवमती मंगलाताई आर.पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या मुख्याधिकारी वनिता काळे, शर्मिला पाटील, वैशाली पाटील, सविता पाटील आदी उपस्थित होते. ताई ठाकरे, वैशाली पवार, मंदाकिनी कराळे, सुनीताताई मुळे, संयुक्ताताई देशमुख, जयश्री पाटील, जयश्री पवार, मुख्य वक्त्या एड वैशाली डोळस, मुकेश शिंदे जी आर एस पाटील, प्रदेशाध्यक्ष मध्य प्रदेश, विलास पाटील राष्ट्रीय अध्यक्ष तनुबाई बिर्जे पत्रकार परिषद, राष्ट्रीय कार्यवाह डॉ. सुनील महाजन, डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, प्रमोद महाजन, गणेश कापसे, देवेंद्र वासिंग, डॉ. मंगेराम चोपडे, परमल सिंग, सेवासिंग आर्य, गणेश पाटील दिव दमण, अनंतराव निकम, दादरा नगर हवेली, प्रशांत ठाकरे उपस्थित होते.

तसेच सर्व राज्यातून आलेले जिजाऊ प्रमुख संयोजक म्हणून भाऊसाहेब पवार राज्य अध्यक्ष, मराठा सेवा संघ गुजरात, डॉ.गिरीश ठाकरे सरचिटणीस मराठा सेवा संघ गुजरात, वंदना ताई साळुंके जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष गुजरात, डॉ.विकास पाटील महानगर अध्यक्ष सुरत, रवी गवळी पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ गुजरात, डॉ. संघ सुरत, कोकिलाबेन पवार, नीता ठाकरे, नयना पाटील, भारती पाटील, वैशाली पोवळे आदींचा समावेश होता.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे