आवासमध्ये श्री सिध्देश्वर मंदिरात अखंड हरीनाम, भजनसेवा
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
आवासमध्ये श्री सिध्देश्वर मंदिरात अखंड हरीनाम, भजनसेवा
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: तालुक्यातील आवास गावात फार पूर्वी पासून आवास ग्रामस्थांतर्फे गावातील ‘श्री सिध्देश्वर मंदिरात’ श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सकाळी ८.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंत अखंड हरीनाम, भजन सेवा करण्याची परंपरा रुढ होती. त्यात बदल होऊन गेल्या काही वर्षांपासून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सकाळी ८.०० ते रात्री ९.०० वाजे पर्यंत अखंड हरीनाम, भजन सेवा करण्याची परंपरा रुढ झाली.
या परंंपरेनुसार ह्या वर्षीही सोमवार दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.०० ते रात्री ९.०० वाजे पर्यंत गावातील श्री सिध्देश्वर मंदिरात आवास ग्रामस्थांतर्फे अखंड हरिनाम, भजन सेवा करण्यात आली. यामध्ये सर्व आवास ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी झाले. त्यानंतर प्रथेप्रमाणे शेवटी आरती करण्यात आली.





