‘सारसबाग व तळ्यातला गणपती’ प्रतिष्ठापना वर्धापनदिन समारंभपूर्वक साजरा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
‘सारसबाग व तळ्यातला गणपती’ प्रतिष्ठापना वर्धापनदिन समारंभपूर्वक साजरा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: पुण्याची प्रमुख ओळख आणि पुण्यनगरीचा मानबिंदू मानली जाणारी सारसबाग आणि तळ्यातील सिद्धी विनायक गणपती यांची प्रतिष्ठापना ज्येष्ठ शुद्ध पंचमीला २४० वर्षापूर्वी करण्यात आली होती.
या प्रतिष्ठापनेचा २४० वा वर्धापन दिन ज्येष्ठ शुद्ध पंचमीला श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘देवयोद्धा’ या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांच्या जीवनावरील ‘देवयोद्धा’ या नावाची संशोधनात्मक महाकादंबरी आणि अग्निरेखा, दर्यादिल दाराशिकोह, दुर्योधन, संताजी इत्यादी पुस्तकांचे लेखक काका विधाते यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, ईतिहास अभ्यासक व विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.