‘काव्यमैफिलीतून स्वप्न साकारतेकडे’ कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न
भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्याबाबत चर्चा

‘काव्यमैफिलीतून स्वप्न साकारतेकडे’ कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न
मुख्य आयोजक व प्रशासनातील सर्व महत्वाचे पधाधिकारी उपस्थित
छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच आढावा बैठकीचे आयोजन
भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्याबाबत चर्चा
प्रशांत ठाकरे,बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ सिलवासा: मराठीचे शिलेदार समूह बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे येत्या मे महिन्यात आयोजित ‘काव्य मैफिलीतून स्वप्न साकारतेकडे’ या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात ऑनलाईन बैठक दि १६ मार्च सांय. ५.०० वा शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या संभाव्य कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता डॉ. पद्मा ताई वाखुरे जाधव, उद्योगपती विजय शिर्के, मुख्य परीक्षक विष्णू संकपाळ, प्रसिद्ध कवयित्री वर्षा मोटे, उपक्रमशील शिक्षक अखिल पठाण इत्यादी आयोजक म्हणून नियोजन करत आहेत.
आजच्या या ऑनलाइन बैठकीत मराठीचे शिलेदार समुहाचे संस्थेचे पदाधिकारी व सर्व प्रशासक तसेच आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.आपल्या मार्गदर्शनात आदरणीय राहुल सरांनी संभाव्य कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. त्यांच्या मनात असलेल्या काही नवसंकल्पना, काव्य संमेलन व प्रकाशन सोहळा याविषयी सर्वांना अवगत केले. जवळपास दहा काव्यसंग्रहांचे प्रकाशन या सोहळ्यात होणार असल्याचे राहुल सरांनी सर्वांना सांगितले.
या कार्यक्रमात भव्य असे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबतच ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेषांक काढण्यावर ही चर्चा झाली. मराठी भाषा सक्षमीकरणाच्या या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन राहुल सरांनी केले.
संपूर्ण दिवसभर आयोजित या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. सदर ऑनलाईन मीटिंगमध्ये ज्येष्ठ साहित्यिका वैशाली अंड्रस्कर ,समूहाच्या कार्यकारी संपादिका सविता पाटील ठाकरे, सहप्रशासक शर्मिला देशमुख, तारका रुखमोडे, संग्राम कुमठेकर, संस्थेचे विश्वस्त अशोक लांडगे, बिनधास्त न्यूजचे पत्रकार रजत डेकाटे इत्यादी उपस्थित होते. शेवटी सिलवासा येथील श्री प्रशांत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.